HW News Marathi
महाराष्ट्र

करुणा शर्मां यांच्या जामिनाचे काय झाले? काय आहे न्यायालयाचा निर्णय?

बीड। बीडचे पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळित आलेल्या आणि त्या नंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याने सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मांच्या जामिना वरील निर्णय सोमवारपर्यंत पुढे गेला आहे. न्या. सापटनेकर यांच्यासमोर आज दोन्हीबाजूंनी युक्तिवाद झाला असून न्यायालय यावर सोमवारी निर्णय देणार आहे.शर्मा यांना ५ सप्टेंबरला अटक झाली होती.करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती.

करुणा शर्मांचा कोठडीतील मुक्काम वाढला

त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केला म्हणून करुणा शर्मांसह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी त्यांना ५ सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर ६ सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावरची सुनावणी पुढे ढकलली जात होती. आज (18 सप्टेंबर) न्या. सापटनेकर यांच्यासमोर शर्मा यांच्या जामिनावर सुनावणी झाली. शर्मा यांच्यावतीने अँड. भारजकर यांनी बाजू मांडली तर सरकार पक्षाच्या वतिने सरकारी वकिल अशोक कुलकर्णी यांनी बाजु मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सोमवारी निर्णय देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे करुणा शर्मांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

नेमकं काय घडलं?

शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यता आलं.

व्हायरल व्हिडीओत काय?

दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शर्मा यांची गाडी बाजारात आल्याचं दिसत आहे. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही थोडावेळ बाजारात थांबली. त्याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत आहे. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकचळवळ आणि लोकांच्या योगदानामुलेच जलयुक्त शिवार यशस्वी – खोतकर

News Desk

कोठेवाडी येथील भगिनींना महाराष्ट्र शासनाची एतिहासिक राखी भेट!

News Desk

गावठी कट्ट्यातून गोळी सुटल्याने बालकाचा मृत्यू

News Desk