HW News Marathi
महाराष्ट्र

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास लिहिण्यासाठी शासनस्तरावर निर्णय घेतला जाणार – धनंजय मुंडे

बीड। स्वातंत्र लढयाचा इतिहास उपलब्ध आहे. त्याच धर्तीवर मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास लिहिण्यासाठी शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे सामाजिक सहाय्य मंत्री आणि बीड जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं. माजलगांव येथील पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे उदघाटन मुंडे यांच्या हस्त झाले. त्यावेळी ते बोलत होते. उदघाटन समारंभास आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप शिरसागर, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

विकासात महत्त्वाचे योगदान आहे

पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, सध्या आपण कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात आहोत. तरीदेखील सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घेत राज्य सरकारने निधी कमी पडू दिला नाही. यातूनच आपत्तीच्या काळात देखील माजलगाव मध्ये विकासाची अनेक काम झाल्याचं मुंडे म्हणाले. मुंडे म्हणाले की, आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि स्वर्गीय सुंदरराव सोळंके यांचा स्मृतिदिन आहे. या महत्वाच्या दिवशी हा लोकार्पण सोहळा झाला. यासाठी आमदार प्रकाश सोळंके यांचे विकासात महत्त्वाचे योगदान आहे. आमदार सोळंके यांची सुरुवात पंचायत समिती सदस्य पदापासून झाली. त्यानंतर ते राज्यात राज्यमंत्री देखील झाले. त्यांचा अनुभव आणि विकास कामांची सुरुवात पंचायत समिती मधूनच झाली. ते सतत विकासासाठी पाठपुरावा करून विकास घडवत आहेत. येथे नगर परिषदेचे सिमेंट रस्ते कोरोना काळात झाले. माजलगाव येथे नाट्यगृहासाठी 5 कोटी रुपये निधीची मंजूरी आणि माजलगाव एम.आय.डी. सी सह विकासाची अनेक काम होत आहेत.

माजलगाव धरण महत्त्वाचे

माजलगाव हा सधन तालुका आहे. यासाठी माजलगाव धरण महत्त्वाचे ठरले असून या धरणास सुंदर सागर असे नामकरण करून येथे चांगले उद्यान विकसित करण्यासाठी निर्णय घेण्यात येईल. बीड जिल्हयातील नवीन जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत आणि सर्व नवीन पंचायत समिती इमारतींमध्ये साधनसामग्री फर्निचर यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ, असं आश्वासनही मुंडे यांनी दिलं.

सामान्य माणसाला येथे आल्यानंतर विश्वास वाटला पाहिजे

आता सर्वात जास्त ऊस उत्पादन बीड जिल्ह्यात होते. तेव्हा येथील सर्वात जास्त मजूर ऊस तोडणी साठी इतर जिल्हयात जातो. बीड जिल्ह्यास हक्काचे पाणी मिळवून देऊ. यातून येथील दुष्काळ पुसून टाकण्यास मदत होईल, असा दावाही धनंजय मुंडेंनी केलाय.आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, तालुक्यातील गोरगरीब सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम पंचायत समितीच्या माध्यमातून घडत असते. सामान्य माणसाला येथे आल्यानंतर विश्वास वाटला पाहिजे. या पंचायत समितीच्या नवीन इमारती मधून विश्वासाने सामान्य माण्साचे काम व्हावे. तसेच योजनांचे उदिदष्ट 100% साध्य करण्याचे काम व्हावे, असे त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महानगरपालिकेच्या रुग्णालयांना होणारा औषधपुरवठा उद्यापासून बंद

News Desk

कल्पकतेने नाविन्यपूर्ण कामे करून मुंबई सुंदर बनविणार! – आदित्य ठाकरे

Aprna

मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही – एकनाथ खडसे

News Desk