HW News Marathi
राजकारण

“उपरती झाल्यामुळेच आम्हाला भावी सहकारी म्हणाले असावेत” -देवेंद्र फडणवीस

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला उद्देशून भावी सहकारी असा उल्लेख केल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “आजच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं असेल, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत, हे त्यांना रिअलाईज झालं असेल. अनैसर्गिक गटबंधनामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही मनातील भावना बोलून दाखवली असेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. पण सध्याची परिस्थिती तशी नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष आहोत. जनतेच्या अपेक्षा घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत. आजच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत, हे त्यांना रिअलाईज झालं असेल , त्यामुळे त्यांना शुभेच्छा, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. पण,

त्यांच्या शुभेच्छा ठिकाय, चांगली गोष्टय.. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. भाजपची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडत आहोत. आणि हे जे अनैसर्गिक गटबंधन झालं आहे, हे फार काळ चालू शकत नाही. कदाचिक मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आलं असेल, अनैसर्गिक गटबंधनामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही मनातील भावना बोलून दाखवली असेल .राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. पण सध्याची परिस्थिती तशी नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष आहोत. जनतेच्या अपेक्षा घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत. आजच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत, हे त्यांना रिअलाईज झालं असेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुमच्यासारखा नामर्द नाही”, संजय राऊतांच नारायण राणेंना सडेतोड उत्तर

Aprna

…तरीही ते राफेलच्या मुद्द्यावर तज्ञ असल्यासारखे बोलतात !

News Desk

काँग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हा यांना पाटना साहिबमधून उमेदवारी जाहीर

News Desk