HW News Marathi
देश / विदेश

“त्या डावांचा पोरखेळ एक दिवस उलटा पडल्याशिवाय राहणार नाही”-शिवसेनेचा विरोधकांवर निशाणा!

मुंबई | करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये अभिनेता सोनू सूदने केलेल्या मदत कार्याचा देशभर गवगवा झाला. त्यातून सोनू सूदला ‘मसीहा’ ही पदवी आपसूकच बहाल झाली. मात्र, आता त्याच सोनू सदवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे चर्चेचा विषय ठरलेल्या या सोनू प्रकरणावरून शिवसेनेनं राज्यात विरोधी आणि केंद्रात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. “विध्वंसक, चुकीच्या माणसांना हाती धरायचे, त्यांना आर्थिक आणि दिल्लीच्या सत्तेचे पाठबळ द्यायचे आणि महाराष्ट्रातल्या लोकांवर घाणेरडे आरोप करायचये. त्या आरोपांची थुंकी झेलण्यासाठी मग तपास यंत्रणा तयारच आहेत”, अशा शब्दांत शिवसेनेनं टीका केली आहे. पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला सुनावण्यात आलं आहे.

मोठ्या राजकीय पक्षाचे मनही मोठे असायला हवे

भाजपाकडून आपल्या विरोधी विचारांच्या पक्षांना आणि व्यक्तींना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. “भाजपा हा जगातील सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष आहे. मोठ्या राजकीय पक्षाचे मनही मोठे असायला हवे. विरोधी पक्षांची राज्याराज्यांतील सरकारे किंवा वेगळ्या विचारांचे लोक यांचा आदर राखण्यातच राज्यकर्त्यांचे मोठएपण आहे. महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या मागे खोटे आरोप लावणे, राज्यपालांनी वरच्या दबावामुळे १२ आमदारांची नियुक्ती रोखणे, सोनू सूदसारख्यांवर आयकर धाडी घालणे हे कोत्या मनाचे लक्षण आहे. हे रडीचे डाव आहेत. त्या डावांचा पोरखेळ एक दिवस उलटा पडल्याशिवाय राहणार नाही”, असं या अग्रलेखात नमूद केलं आहे.

दरम्यान, भाजपाच्या काही पुढाऱ्यांना वरच्यांचं पाठबळ असल्याशिवाय ते ईडीच्या कार्यालयात इतक्या बिनधास्तपणे जाऊ शकत नाहीत, असं देखील अग्रलेखात म्हटलं आहे. “जे भाजपाशी संबंधित नाहीत, अशांचा तपास यंत्रणांच्या माध्यमातून बंदोबस्त करणे हे धोरण ठरलं आहे. त्यातून राज्यातील मंत्री सुटले नाहीत तसे सोनू सूदसारखे कलाकार आणि सामाजिक कार्य करणारेही सुटले नाहीत. भाजपाचे काही चवचाल पुढारी हे स्वत:च्या बाथरूममध्ये घुसावेत, तसे रोज ईडीच्या कार्यालयात जाऊन मोकळे होत आहेत. इतका आत्मविश्वास आणि धैर्य वरच्यांच्या पाठबळासिवाय येणं शक्यच नाही”, अशी टीका करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑगस्ता वेस्टलँड घोटाळा : ख्रिस्तियन मिशेल भारताच्या ताब्यात

News Desk

अमृतसरच्या निरंकारी भवनमध्ये ग्रेनेड स्फोट

News Desk

मॅगी पुन्हा संकटात

News Desk