HW News Marathi
महाराष्ट्र

अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेणार; 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणी!

मुंबई। यंदाच्या दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळाले असले तरी विद्यार्थ्यांना सहजासहजी अकरावीसाठी प्रवेश मिळणार नाही. या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना यंदा सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे.

राज्य शिक्षण मंडळाकडून सीईटीचे वेळापत्रक कधी जाहीर होणार, याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांना लागली आहे. सीईटीचे वेळापत्रक आणि अर्ज नोंदणी यासंबंधीची माहिती सोमवारी (१९जुलै) मिळणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी ही माहिती दिली. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देण्यात येईल, असेही दिनकर पाटील यांनी यावेळी सांगितले.

इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर आता लगेचच इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे. त्यासाठी येत्या 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणीस सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. 19 जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. दरवर्षी दहावीतील गुणांच्या आधारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया होते. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यायची आहे की नाही एवढेच संकेतस्थळावर जाऊन स्पष्ट करायचे आहे, असंही पाटील यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही, म्हणजे नाही | राज ठाकरे

News Desk

मराठा मूकमोर्चांवर बंदीस न्यायालयाचा नकार

News Desk

देशातील शेतकऱ्यांना संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव – राजू शेट्टी

News Desk