मुंबई | देशात आज एक महत्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (१७ जुलै) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीने संपूर्ण देशातील राजकीय वातावरण खवळून निघालं. अनेक चर्चा सुरु झाल्या. मात्र, या सगळ्या शंकांच, चर्चेचं निरसन करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत मोदी-पवार भेटीचं कारण स्पष्टपणे सांगितलं.
नवाब मलिक म्हणाले की, शरद पवार आणि मोदींची भेट ही संसदीय अधिवेशनाआधीची सदिच्छा भेट होती. मोदी-पवार यांच्या भेटीबाबत अफवा पसरवल्या जात आहे. वास्विक यावेळी त्यांच्यात सहकारी बॅंकांच्या नियमांच्या विसंगतीबाबत चर्चा झाली. आरबीआयच्या नियमांमुळे सहकारी बॅंकाना फटका बसला आहे. यावर मोदी आणि पवार यांच्यात चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची भेट झाल्याची माहिती चुकीची आहे अशी कोणतीही भेट झाली नाही, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, पियुष गोयल यांनी स्वत: जाऊन शरद पवारांची भेट घेतल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
शरद पवारांनीच केला मोदींसोबतच्या भेटीचा खुलासा
शरद पवार यांनी मोदींची भेट घेतलेला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. राष्ट्रहिताच्या विविध विषयांवर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याशी चर्चा केली असल्याचे कॅप्शनमध्ये पवारांनी नमूद केले आहे.
Met the Hon. Prime Minister of our country Shri Narendra Modi. Had a discussion on various issues of national interest.@PMOIndia pic.twitter.com/AOp0wpXR8F
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 17, 2021
यापूर्वी महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होण्यापूर्वी शरद पवार आणि मोदी यांची भेट झाली होती. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी शरद पवारांची भेट घेतली होती. यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही पवारांची भेट घेतली होती. यानंतर दुसर्याच दिवशी पवारांनी पंतप्रधान मोदींची पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली.
हे आहे पवार-मोदींच्या भेटीचं प्रमुख कारण – जयंत पाटील
जयंत पाटील यांनी या भेटीमागे सहकार क्षेत्रातील परिस्थिती हे मुख्य कारण असल्याचं सांगितलं. “देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रातल्या लोकांनी गेल्या महिन्या-दीड महिन्यात अनेक पत्र पाठवली. त्या सगळ्यांचा विचार करून केंद्र सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत, यासाठी शरद पवार त्यांना भेटायला गेले”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.