HW News Marathi
महाराष्ट्र

आरोपीच्या सांगण्यावरून कारवाई कशी होऊ शकते? हसन मुश्रीफ यांचा ईडीला सवाल

कोल्हापूर | राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर आज (१६ जुलै) ईडीने कारवाई केली असून त्यांची ४ कोटी ची मालमत्ता जप्त केली आहे. त्यांच्या या कारवाईवर आता राजकारणात हालचालींना वेग आला आहे, अनेक नेते आपलं मत मांडत आहेत. त्यावरून कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी ईडीलाच सवाल केला आहे. एखाद्या आरोपीच्या सांगण्यावरून एवढी मोठी कारवाई कशी होऊ शकते?, असा सवालच हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

आरोपीच्या सांगण्यावरून कारवाई

सध्या महाविकासआघाडीचे नेते ईडीच्या रडार वर आहेत असं दिसून येतंय. अनिल देशमुख यांची आज मालमत्ता ईडीने जप्त केली असून आता राष्ट्रवादीतले नेते खवळले आहेत. परमवीर सिंग आणि सचिन वाझे या दोघांनी मुकेश अंबानी यांच्या घरा बाहेर स्फोटक ठेवली त्याचा उलगडा झाला नाही. स्फोटक का ठेवली? मास्टर माईंड कोण याचा शोध एनआयए घेऊ शकली नाही. वाझेची चौकशी बाजूलाच राहिली. आरोपीच्या सांगण्यावरून एवढी मोठी कारवाई कशी होऊ शकते?, असा सवाल करतानाच मुद्दाम हे षडयंत्र सुरू आहे, असा आरोप मुश्रीफ यांनी केला.

४ कोटींची मालमत्ता जप्त

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याचं कारण असं की, आज (१६ जुलै) ई़डीने अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती जप्त केली आहे. यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. इतकंच नाही तर, काही दिवसांपूर्वी समन्स पाठवून ईडीने अनिल देशमुखांचा चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, ते चौकशीसाठी गैरहजर होते. काल (१५ जुलै) अनिल देशमुखांची पत्नी आरती देशमुख यांनाही ईडी कायर्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, कोरोनाचा कारण देत त्याही चौकशीला गैरहजर होत्या. यामुळे देशमुखांच्या अडचणीत एकूणच वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२०१९ पासून किरण गोसावी फरार, सचिन पाटील नावाने करायचा फसवणूक- पुणे पोलीस

News Desk

आधी फडणवीस, आता शेलार म्हणाले विमानतळाच्या उद्घाटनला मुख्यमंत्र्यांनी यावं!

News Desk

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक!

News Desk