इंग्लंड। सध्या भारतीय क्रिकेट संघ हा इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे या संघाला आता कोरोनाचा फटका बसला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज असलेला आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे, तर ऋषभ पंतला इंग्लंडमध्येच त्याच्या नातेवाईकाच्या घऱी विलगीकरण करण्यात आलं आहे. करोनातून बरं झाल्यानंतर ऋषभ पंत पुन्हा संघात परतेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान पंतशिवाय भारतीय संघ डरहॅममध्ये बायो बबलमध्ये परतला आहे.
ऋषभ पंतला घसा खवखवण्याचा त्रास जाणवत होता. त्या नंतर त्याची कोविड तपासणी करण्यात आली, आणि त्यात ऋषभचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने त्याच्या संपर्कात असलेल्या खेळाडूंना देखील आता विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेला आहे. मात्र अस असतांना आता ऋषभ पंतचा विलगीकरणाचा कालावधी संपला आहे.
इंग्लंड क्रिकेट संघावर कोरोनाचं महाभयंकर सावट असतानाच भारतीय खेळाडूलाही कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. इंग्लंड संघाची नुकतीच पाकिस्तानविरोधात एकदिवसीय मालिका पार पडली. मात्र पहिल्या एकदिवसीय सामन्याआधीच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने संघातील सात सदस्यांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये तीन खेळाडू आणि चार कर्मचारी असल्याची माहिती दिली होती. यामुळे इंग्लंड संघात बदल करण्यात आले आणि बेन स्टोक्सकडे कर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर भारतीय खेळाडूंना बायो बबलमधून बाहेर पडत वेळ घालवण्याची परवानगी देण्यात आली होती. २३ जूनला चॅम्पियनशिपची फायनल झाली. बीसीसीआयनेही परवानगी देताना खेळाडू आणि इतर कर्मचारी जुलैच्या मध्यात पुन्हा बायो बबलमध्ये परततली असं स्पष्ट केलं होतं. भारतीय संघ इंग्लंडविरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.
इंग्लंडने ३-० ने पाकिस्तानचा पराभव करत मालिका जिंकली आहे. मात्र बायो बबल सुरक्षा असतानाही करोनाने शिरकाव कसा केला असा प्रश्न सर्वांना सतावत आहे. पाकिस्तान मालिकेआधी श्रीलंकेने इंग्लंडचा दौरा केला होता. पण मायदेशी परतल्यानंतर त्यांनाही कोरोनाचा सामना करावा लागला. यामुळे भारताविरोधातील एकदिवसीय मालिका पुढे ढकलावी लागली. १३ जुलै रोजी होणारी ही मालिका १८ जुलैला होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.