HW News Marathi
महाराष्ट्र

आपल घरं का सोडायचं ? पंकजांच्या भाजप सोडण्याच्या चर्चांना पुर्णविराम !

मुंबई। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नाराज समर्थकांची वरळी निवासस्थानी बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधला. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मला कुणालाही राजकारण संपवून राजकारण करायचं नाही, असं सांगतानाच मी तुमच्या सर्वांचे राजीनामे फेटाळून लावत आहे, असं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं. यावेळी पंकजा मुंडे यांनी दबावतंत्र करत नसल्याचं स्पष्ट केलं. मला दबाव तंत्र करायचं असेल तर ही ती जागा नाही. ही जागा पुरणार नाही. त्यासाठी वेगळी जागा लागेल, असं पंकजा म्हणाल्या.

फटकार खावून येईल असं वाटतं का?

काल मी दिल्लीत गेले होते. पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. तुम्ही कार्यकर्त्यांना समजवाल हे त्यांनी सांगितलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला झापल्याच्या बातम्या आल्या. मी फटकार खावून तुमच्यापुढे आली असेल असं वाटतं का?, असा सवालही त्यांनी केला.

मी मंत्रिपद नाकारलं-

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मला केंद्रात मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. तेव्हा मी मंत्रिपद नाकारलं होतं. आता मी पद मागेल का?, असा सवालही त्यांनी केला.

समर्थक मुंबईत, मोठी गर्दी-

भाजपचा निषेध म्हणून पदांचा राजीनामा देणारे पंकजा समर्थक मुंबईत दाखल झाले आहेत. सकाळीच घोषणा देत पंकजा समर्थकांनी वरळी गाठली. या समर्थकांनी वरळीतील पंकजा मुंडे यांच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी केली आहे. मुंडे भगिनींना सातत्याने डावलण्यात येत असून त्याचा निषेध म्हणून आम्ही राजीनामे दिले आहेत, असं या समर्थकांनी सांगितलं. तर, पंकजा मुंडे या समर्थकांची नाराजी दूर करून त्यांना राजीनामा मागे घेण्यास सांगणार असल्याचं सांगितलं जात आहे. पंकजा यांच्याकडून समर्थकांना सबुरीने घेण्याचा सल्लाही दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घर का सोडायचं-

आपण आपलं घर का सोडायचं जेव्हा घराचं छत अंगावर पडेल तेव्हाचं तेव्हा बघू आणि माझी नेते मोदी अमित शहा त्यांच्या मनात माझ्याबद्दल विश्वास आहे असे देखील यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना पंकजा म्हणाल्या. मी पदावर जरी नसले तरीदेखील तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने मी सजलेली आहे असेही त्या म्हणाल्या. मी दुःखी नाही, तुम्ही दुःखात आहात तुमचं जे दुःख आहे ते माझ्या ओटी मध्ये टाका असा सल्ला देखील पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

तर पंकजा मुंडे यांनी आज वरळीत पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करतानाच दिल्लीत नेमकं काय घडलं याचीही माहिती दिली. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मी असुरक्षित नाही. मला कुणालाही संपवून राजकारण करायचं नाही. त्यामुळे मी तुमच्या सर्वांचे राजीनामे नामंजूर करत आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारच्या चांगल्या कामाला ‘दिलसे’ पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत – रोहित पवार

News Desk

प्रकल्पांना तात्काळ मंजुरी देईन…

swarit

सत्तेत राहून विरोधकांची भूमिका बजावणार-उद्धव ठाकरे

News Desk