HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोना थोतांड, वारकऱ्यांनो रस्त्यावर उतरा, मंदिराची कुलुपे तोडा, संभाजी भिडेंचं वादग्रस्त आव्हान

सांगली | कोरोना काळात विषाणूचा प्रसार अजून वाढू नये म्हणून सरकारने यंदाही आषाढी वारीवर निर्बंध लावले आहेत. पायी यंत्रणा मनाई तर मोजक्या मानाच्या पालख्यांना परवानगी दिली आहे. या निर्णयावरून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “कोरोना म्हणजे थोतांड आहे. सरकार हे थोतांड का वाढवत आहे कळत नाही, मात्र हे सर्व देशात चाललेले षडयंत्र आहे”. इतकंच नाही तर वारकरी रस्त्यावर उतरले पाहिजेत, मंदिराची कुलुपे तोडायला हवीत, असंही संभाजी भिडे म्हणाले. पंढरपूरच्या वारीवर घातलेल्या बंदीला वारकर्‍यांनी विरोध करून रस्त्यावर उतरायला हवं होतं, असं त्यांनी नमूद केलं.

कोरोना म्हणजे थोतांड

संभाजी भिडेंनी असं हे वादग्रस्त वक्तव्य पहिल्यांदा केलंय असं नाही आहे. त्यांनी यापूर्वीही अनेकवेळा कोरोना थोतांड असल्याचं म्हटलं आहे. संभाजी भिडे यांनी देशात आणि राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन शंका उपस्थित केली आहे. महाराष्ट्रात आज भगवंतांचे नामकरण करत वारीला जाण्यासाठी बंदी घालण्यात आली. कारण काय तर वारीमुळे कोरोन वाढू शकतो. मात्र कोरोना म्हणजे थोतांड आहे. निव्वळ थोतांड आहे, कोरोना वगैरे काही नाही, लॉकडाऊनमुळे जेवढं वाटोळं झालंय. सरकारचा अत्यंत चुकीचा निर्णय, पुढारी लोक काय लायकीचे आहेत ते माहिती आहे. एकजात सर्वजण स्वार्थी आहेत असं संभाजी भिडे म्हणाले.

आषाढी वारी झाल्यावर जगातील कोरोना नामशेष होईल

संभाजी भिडे म्हणाले की, आपल्या सर्वांना कोरोना मुक्त हिंदुस्थान व्हावा असे वाटते आणि ते होणार आहे. त्यामुळे पायी वारीला परवानगी द्यावी अशी त्यांनी मागणी केली. यावेळी श्रीशिवप्रतिष्ठानच्यावतीने निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर अशा पायी वार्‍या करणारे लाखो वारकरी आहेत. वर्षानुवर्षे ही परंपरा आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे वारीची परंपरा खंडीत झाली आहे. परंतु वर्षी पंढरीच्या वारीसाठी वारकरी उत्सुक होते. राज्यातील काही जिल्हे वगळता कोरोना संसर्ग कमी आहे. राज्यातील इतर सर्व राजकीय कार्यक्रम सुरू आहेत.

वारीला जर बंदी घातली नसती,तर देशात एकही उदाहरण मिळालं नसतं

आषाढीच्या वारीवर बोलताना ते याआधीही बोले होते कि, कोरोनामुळे आज देशात काय घडलं असेल,तर लोकांमध्ये फक्त भीतीचं आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वारीला जर बंदी घातली नसती,तर देशात एकही उदाहरण मिळालं नसतं की कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. माझं मत आहे की, कोरोना हे षडयंत्र आहे. देशाचे हे दुर्दैव आहे, असं संभाजी भिडेंनी नमूद केलं. पंढरपूरच्या वारीला बंदी घातल्यानंतर वारकर्‍यांनी रस्त्यावर उतरायला हवे होते. एकादशी दिवशी बंदी घातले जाते, त्यावेळी मंदिरांची कुलुपं तोडून टाकून मंदिर उघडी करायला पाहिजे, असंही संभाजी भिडे म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अपयश झाकण्यासाठीच सरकारकडून मुद्द्यांना बगल

News Desk

गुरव बांधवांचे समाजातील स्थान महत्त्वाचे आणि आदराचे! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडीला पुन्हा डिवचले

News Desk