HW News Marathi
महाराष्ट्र

जानकरांची राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, माळशिरस तालुक्याची कार्यकारिणी बरखास्त!

सोलापूर। राष्ट्रवादी काँग्रेसची माळशिरस तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. आणि विधानसभेचे पराभूत उमेदवार उत्तमराव जानकर यांनी पक्षाकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी माळशिरस तालुक्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीपूर्वी माणिक वाघमोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. याशिवाय तालुक्याची कार्यकारिणी नियुक्त झाली होती. यावेळी विधानसभेचे पराभूत उमेदवार उत्तम जानकर यांनी माणिक वाघमोडे यांच्या निवडीबाबत पक्षाकडे तक्रार केली होती. उत्तम जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत.

देशमुख आणि जानकर गट-

उत्तम जानकर यांनी तालुक्याची राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्या नियंत्रणाखाली असावी, अशी अपेक्षा पक्षश्रेष्ठींसमोर व्यक्त केली होती. या शिवाय माळशिरस तालुक्यात शंकरराव देशमुख आणि उत्तम जानकर असे दोन गट तयार झाले होते. प्रदेशवर असणारे शंकरराव देशमुख यांनी तालुक्याची कार्यकारिणी परस्पर जाहीर केली होती. आता उत्तम जानकर यांच्या तक्रारीवरून माळशिरस राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.

जानकरांचा पराभव-

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. जिल्ह्याचे प्रमुख नेते विजयसिंह मोहिते यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माळशिरस विधानसभा निवडणूक उत्तम जानकर यांनी लढवली होती. मात्र उत्तम जानकरांचा कमी मताने पराभव झाला होता.

उत्तम जानकर, गोपीचंद पडळकर-

भाजपाचे नेतृत्व बहुजनांच्या खांद्यावर बंदुका ठेऊन आपली राजकीय पोळी भाजत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी नेतृत्वावर केलेल वक्तव्य लांच्छनास्पद आहे”, अशी टीका गोपीचंद पडळकर यांचे मित्र आणि धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांनी केली होती भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, असं वक्तव्य केल्याने, राज्यभरात निदर्शने झाली होती आणि राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेऊन पडळकरांनी माफी मागावी अशी मागणी केली होती , त्यांच्या याच विधानाचा निषेध त्यांचे मित्र उत्तमराव जानकर यांनी केलेला आपण पाहिला आमदार पडळकर आणि उत्तमराव जानकर यांनी धनगर आरक्षण प्रश्नावर एकत्र पाठपुरावा केला. धुमस या चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका दोघांनी एकत्र केली होती. त्यानंतर जानकर यांनी सुध्दा पडळकर यांचे वक्तव्य लांच्छनास्पद असल्याची टीका केली होती. बहुजन समाजाचे नेते भाजपात गेल्यानंतर त्यांना कोणते प्रशिक्षण देतात की बहुजन नेते आक्षेपार्ह वक्तव्य करत सुटतात. रावसाहेब दानवे, राम कदम, यांच्यासह अनेक भाजप नेते पोपटपंची करतात. त्यात आता पडळकर यांची भर पडली आहे. धनगर समाजाचे नाव घेऊन पडळकरांनी राजकारण करु नये. समस्त धनगर समाज पडळकरांचा तीव्र निषेध करतो”, असं उत्तमराव जानकर म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची पोलिसांसमोर हजेरी, अलिबागमध्ये बंदोबस्त वाढवला!

News Desk

‘हर्षवर्धन यांचा राजीनामा घेण्याऐवजी मोदींनीच राजीनामा द्यायला हवा’, नाना पटोलेंची टिका!

News Desk

राज्यातील शाळा कधी सुरू होणार? शालेय मंत्र्यांनी दिली माहिती

News Desk