HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांनी फोनवरून नारायण राणेंना दिल्या शुभेच्छा!

मुंबई | मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काल (७ जुलै) पार पडला. या वेळी महाराष्ट्रातल्या ४ मंत्र्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रिपद जाहीर झाल्यापासूनच राणेंना अनेकांकडून शुभेच्छा येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्याचं राणे यांनी सांगितलं आहे.

पवारांनी राणेंना फोनवरून दिल्या शुभेचछा

राणेंना मंत्रिपद जाहीर केल्यापासून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच, ‘शरद पवार यांनी मला फोन केला, चांगलं काम करा, असे ते म्हणाले. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप मला शुभेच्छा दिलेल्या नाहीत. कारण त्यांचं मन एवढं मोठं नाही. मला मंत्रीपद मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलेले नाही. मात्र, महाराष्ट्रातील सर्व विभागातून मला शुभेच्छा मिळाल्या, त्याच मी त्यांच्या वतीने शुभेच्छा समजतो, असेही नारायण राणेंनी म्हटले.

संजय राऊत काय म्हणाले?

“नारायण राणे यांना मंत्री केलं आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय दिलं आहे. नारायण राणे यांची उंची त्यापेक्षा मोठी आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री होते, अनेक पदं त्यांनी सांभाळली आहेत,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसंच नारायण राणेंसमोर महाराष्ट्र आणि देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचं तसंच करोना काळात कोलमडलेल्या उद्योगांना संजीवनी देण्याचं आव्हान असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकांत’, शंभूराज देसाईंचं मोठं विधान

News Desk

विधानपरिषदेच्या चार जागांचा आज निकाल

News Desk

पारनेरमध्ये शिवसेनेच्या ५ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश , शिवसेनेला धक्का

News Desk