शिमला | हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरभद्र सिंग यांचं निधन झालं आहे. गुरुवारी शिमला येथे पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८७ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असणारे विरभद्र सिंग यांनी इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जनक राज यांनी दिली आहे.
As a mark of respect to former CM and Congress leader Virbhadra Singh, the Government of Himachal Pradesh has decided to observe three days of state mourning, from 8th July to 10th July.
(File photo) pic.twitter.com/glxOjZm1GC
— ANI (@ANI) July 8, 2021
विरभद्र सिंग यांना सोमवारी ह्रदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं अशी माहिती डॉक्टर जनक राज यांनी दिली आहे. नऊ वेळा आमदार आणि पाच वेळा खासदार राहिलेल्या विरभद्र सिंग यांनी सहा वेळा हिमाचल प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं.सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेले विरभद्र सिंग १९९८ ते २००३ मध्ये विरोधी पक्षनेते होते. याशिवाय केंद्रीय मंत्रीपदीदेखील होते. तसंच १९७७, १९७९, १९८० आणि २६ ऑगस्ट २०१२ ते डिसेंबर २०१२ पर्यंत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी होते.
विरभद्र सिंग यांना जून महिन्यात करोनाची लागण झाली होती. दोन महिन्यात दोन वेळा त्यांनी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. याआधी १२ एप्रिलला त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना चंदिगडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. करोनामधून बरं झाल्यानंतर ३० एप्रिल रोजी रुग्णालयातून घरी परतल्यानंतर काही तासातच त्यांना श्वसनाचा आणि ह्दयासंबंधी त्रास जाणवू लागला होता. तेव्हापासून ते रुग्णालयात दाखल होते.
हिमाचल प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री श्री वीरभद्र सिंह जी का निधन न केवल प्रदेश बल्कि कांग्रेस परिवार और देश के राजनीतिक जगत के लिए अपूरणीय क्षति है।
देश-प्रदेश के लिए उनका योगदान सदैव स्मरणीय रहेगा।
कांग्रेस परिवार अपने वरिष्ठ सदस्य के निधन पर भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करता है। pic.twitter.com/EHRqF0GcEj
— Congress (@INCIndia) July 8, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही व्यक्त केला शोक
विरभद्र सिंग यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त केला आहे.
Shri Virbhadra Singh Ji had a long political career, with rich administrative and legislative experience. He played a pivotal role in Himachal Pradesh and served the people of the state. Saddened by his demise. Condolences to his family and supporters. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) July 8, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.