HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचे १२ निलंबित आमदार पुन्हा एकवटले, फडणवीसांच्या निवासस्थानी खलबतं सुरू

मुंबई | राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाविकासआघाडी सरकारने जोरदार बॅटींग करत भाजपला बॅकफूटवर पाठवलं. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी केलेल्या गैरवर्तणूकीची शिक्षा म्हणून भाजपच्या १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या भाजपच्या १२ निलंबित आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन राज्यपालांनी त्यांना दिलं आहे. त्यानंतर आता हे सर्वच्या सर्व बारा आमदार पुन्हा एकदा एकवटले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी हे आमदार जमले असून पुढील रणनीतीवर खलबतं सुरू झाली आहेत.

आज (७ जूलै) सकाळी 11च्या सुमारास निलंबित बाराही आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जमले आहेत. पुढील रणनीती काय ठरवायची याबाबतची चर्चा करण्यासाठी हे आमदार फडणवीस यांच्या निवासस्थानी जमले आहेत. या बैठकीत कोर्टात जाण्यावर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी कायदेशीर पर्याय काय आहेत? कोर्टात बाजू कितपत टिकून धरेल यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

माफी मागणार का?

कोर्टात जायचं नसेल तर अन्य काय पर्याय उरतात यावरही या बैठकीत खल होणार आहे. काही दिवस शांत बसून विधानसभा अध्यक्षांची माफी मागून निलंबन वापस घ्यायला लावायचे की वर्षभर निलंबित राहून जनतेत जाऊन ठाकरे सरकारविरोधा रान पेटवून द्यायचं यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. निलंबनाचा निर्णय तसाच राहणार की मागे घेतला जाणार हे पाहणेही महत्वाचे असणार आहे.

भाजपच्या या १२ आमदारांचं निलंबन

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

आशिष शेलार

योगेश सागर

अभिमन्यू पवार

संजय कुटे

अतुल भातखळकर

पराग अळवणी

गिरीश महाजन

राम सातपुते

हरीश पिंपळे

नारायण कुचे

जयकुमार रावत

किर्तीकुमार बागडीया

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पक्षासाठी आयुष्य वेचलेले सत्ते बाहेर तर राणें सारखे मंत्री कसे होतात ?

News Desk

बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजपचा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या राजकारणाला समर्थन-चंद्रकांत पाटील

News Desk

कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील! – अजित पवार

Aprna