HW News Marathi
महाराष्ट्र

‘आईवरून शिवीगाळ करणारे भास्कर जाधवच’, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

मुंबई | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन बऱ्याच विषयांसाठी गाजलं. यावेळी महाविकासआघाडी आणि विरोधीपक्षनेते आमने सामने आले. दरम्यान भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तालिका सदस्य भास्कर जाधव यांनी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना काही सदस्यांनी सभागृहात गदारोळ केला. विरोधी सदस्य आत घुसले त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या असं म्हणत विरोधकांना सुनावलं होतं. त्यातच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भास्कर जाधव यांनी आईवरुन शिवी दिली असल्याचा आरोप केला आहे.

बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव पवारांसारखे होतील असं अपेक्षित नव्हतं

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित केल्याने भाजप नेते आक्रमक झाले आहेत. “हिंदूह्रदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव इतक्या लवकर पवारांसारखं बोलायचं एक आणि करायचं एक होतील असं माझ्यासारख्या व्यक्तीने अपेक्षित केलं नव्हतं,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या युतीसंबंधी वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना लगावला.

भाजपचे १२ आमदार झाले निलंबित

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारकडून मिळावा म्हणून अधिवेशनात ठराव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली. त्यानंतर भुजबळांनी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो. मग ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही? असा सवाल भुजबळ यांनी केला. त्यावर फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा मांडला. त्यावेळी तालिका अध्यक्षांनी फडणवीसांचा हरकतीचा मुद्दा स्वीकारला नाही. अध्यक्षांनी भुजबळांना बोलण्यास सांगितलं. त्यामुळे भाजपचे आमदार आक्रमक झाले.

भाजपच्या कोणत्या आमदारांचं निलंबन?

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

आशिष शेलार

योगेश सागर

अभिमन्यू पवार

संजय कुटे

अतुल भातखळकर

पराग अळवणी

गिरीश महाजन

राम सातपुते

हरीश पिंपळे

नारायण कुचे

जयकुमार रावत

किर्तीकुमार बागडीया

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दगडूशेठ गणपतीला तब्बल 61 किलोंचा मोदक…..!

News Desk

अल्टिमेटमवर देश चालतोय का?, संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल

Aprna

कस्तुरबा रुग्णालयात मुंबईतील ६ ‘कोरोना’ संशयित दाखल

swarit