HW News Marathi
महाराष्ट्र

उच्च न्यायालयाचा प्रताप सरनाईकांना दिलासा…!

मुंबई। मनी लॅान्ड्रींगच्या आरोपात अडचणीत आलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने २८ जुलैपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. उच्च न्यायालाच्या या निर्णयामुळे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळनार आहे. मनी लॅान्ड्रींग प्रकरणी ईडीने सुडबुद्धीने कारवाई करुन नये यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. अंमलबजानणी संचालनालयाने (ED) अटक करु नये अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. दरम्यान सरनाईक यांच्यासह त्यांचा मुलगा पूर्वेश, विहंग आणि मेहुणा योगेश चांदेगला यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकांवर आज (६ जुलै)उच्च न्यायालयाने सुनावणी देत आमदार प्रताप सरनाईकांवर ईडीने २८ जुलैपर्यंत कोणतीही कारवाई करु नये असे आदेश दिले आहेत.

मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार असलेले प्रताप सरनाईक यांनी विधानसभेच्या सभागृहात आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल आवाज उठवत दाद मागितली आहे. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असून माझ्यावर आरोप म्हणजे ठाकरे सरकारवर आरोप आहे. त्यामुळे सरकारने मला क्लिन चिट द्यावी, अशी मागणीच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज विधानभवनात केली आहे.

मला ईडीकडून विनाकारण त्रास दिला जात आहे. लोकांना भुजबळ, अनिल देशमुख करेन अशी धमकी दिली जात आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या घोटाळ्याचा तपास हा ED ने घेतला. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि माझ्यावर आरोप होत आहे म्हणजे सरकारवरही होत आहे, असं सरनाईक म्हणाले. तसेच ‘मी गृहमंत्र्यांना ते पत्र लिहिलं आहे की, घोटाळा केला असेल तर प्रताप सरनाईक अटक झाली पाहिजे पण जर घोटाळा झाला नसेल तर तो अहवाल बाहेर आणा नाहीतर क्लिनचिट द्या. जर मी गुन्हा केला असेल तर मला फासावर लटकवले पाहिजे, असंही सरनाईक म्हणाले. सरनाईक यांनी सभागृहात ईडीकडून होत असलेल्या कारवाईबद्दल आपली भूमिका मांडली.

काय आहे प्रकरण ?

मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना चांगलेच भोवणार असं दिसतं आहे. कारण, अंमलबजावणी संचनालयानं (ED) ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासानुसार त्यांनी ईडी कोठडी अहवाल केला आहे. या अहवालात ईडीने थेट प्रताप सरनाईक यांचे नाव घेतले असून प्रताप सरनाईक यांच्यावर ईडी कोठडी अहवालात गंभीर आरोप करण्यात आले आहे.

MMRDA मधील बनावट टॉप्स सुरक्षा रक्षकांची अर्धी रक्कम प्रताप सरनाईकांना जात होती, असा दावा इडीने न्यायालयासमोर केला आहे. अमित चंडोळे याला अटक केल्यानंतर त्याची ईडी कोठडी मिळावी याकरता ईडीने त्यांच्या कोठडी अहवालात प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 ‘अनाथांची माय’ काळाच्या पडद्याआड! सिंधुताई सपकाळ यांचं निधन, सर्व स्तरांतून मोठी हळहळ

Aprna

रजनीश शेठ यांनी नाकारली पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी; सूत्रांकडून माहिती

Aprna

कर्मचाऱ्यांच्या पगाराला पैसे नाहीत, मंत्र्यांच्या गाड्यांसाठी मात्र लाखोंची उधळपट्टी

News Desk