HW News Marathi
देश / विदेश

विधीमंडळाच्या बाहेरच भाजपची प्रतिविधानसभा ! सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार

मुंबई। राज्याच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तालिका विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्यामुळ तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ दिगग्ज आमदारांना १ वर्षांसाठी निलंबीत केलं आहे. याचा निषेध करत आज (६जुलै) अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी भाजपने विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. तसेच “सरकारच्या कामाचा धिक्कार असो” असा नारा देत विधीमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत भाजपने विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपने प्रतिविधानसभा भरवली आहे. या प्रतिविधानसभेचे अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांना नियुक्त करण्यात आले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबतची घोषणा केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रतिविधानसभेत सदस्यांना आपलं मत मांडण्याची संधी देण्याची विनंती देखील केली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

महाराष्ट्रातील शेतकरी, OBCराजकीय आरक्षण, विद्यार्थी आणि एमपीएससीचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवर सरकारमध्ये आवाज उठवला तर खोट्या आरोपाखाली निलंबित करण्यात येत आहे. जे घडलेच नाही अशा गोष्टी सांगून खुर्चीवरुन खोटं बोलून आमदारांना निलंबित केलं जात आहे. म्हणून आज या विधानसभेत या सरकारचा धिक्काराचा प्रस्ताव ठेवतो आहे. हा जो प्रस्ताव मांडतो आहे तो सरकारच्या विरोधात विनंती करतो आहे की, या प्रस्तावावर चर्चा सुरु करावी आणि त्या संदर्भात अनेक सदस्यांना आपलं म्हणणं या सरकारच्या विरोधात, वसूली भ्रष्टाचाऱ्यांचा पर्दाफाश करायचा आहे. सदस्यांनी नावे दिले आहेत त्यांना मत मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी आहे

भास्कर जाधवांचा भाजपच्या प्रतिविधानसभेवर आक्षेप !

भास्कर जाधव यांनी भाजपच्या प्रतिविधानसभेवर आक्षेप घेतला आहे. विधीमंडळ परिसरात खासगी पत्रक वाटण्याचा आणि अशाप्रकारे जमाव करुन स्पीकर लावून भाषण करण्याचा अधिकार आणि परवानगी कोणी दिली. भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांना चौकशी करण्याची विनंती केली आहे. पायऱ्यांवर विरोधी पक्षनेते आणि सदस्य बसले आहेत. त्या बसण्याला विरोध नाही परंतु त्यांच्याकडे स्पीकर आहे आणि ते भाषण करत आहेत. त्यांना अशा प्रकारची स्पीकरची परवानगी दिली आहे का? ही परवानगी दिली असेल तर त्याबाबत स्पष्टता द्या, अन्यथा ज्यांनी स्पीकर दिला असेल त्यांच्यावर कारवाई करा, विधानभवनाच्या सुरक्षा रक्षकांना बोलवले आणि त्यांना कारवाई करण्यास सांगितले तर कारवाई केली नसल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. सभागृहाकडून विरोधी पक्षनेत्यांना पायऱ्यांवर प्रतिविधानसभा भरवण्याची परवानगी दिली नाही. तसेच भाषण करण्यासाठी स्पीकर लावण्याची परवानगीही दिली नव्हती त्यामुळे ही परवानगी कोणी दिली आणि कोणाच्या परवानगीने भाजप नेत्यांनी प्रतिविधानसभा भरवली याबाबत चौकशी करण्याची सूचना विधानसभा उपाध्यक्षांनी केली आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी माईक जप्त करण्याच्या सूचनाही विधानसभा उपाध्यक्षांनी दिल्या आहेत. भाजपच्या या प्रति विधानसभा घेण्यावरून चांगलाच गदारोळ पहायला मिळाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रात्री १० नंतरही मी फटाके फोडणार !

Gauri Tilekar

गोपाल कृष्ण गांधी उपराष्ट्रपदासाठी विरोधकांचे उमेदवार

News Desk

कर्जदारांसाठी खुशखबर! कर्जवसूली स्थगितीला २८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

News Desk