पुणे | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सध्या पुण्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचा आढावा घेत आहेत. इतकंच नाही तर आठवड्याच्या दर शुक्रवारी ते बैठक घेतात. काल (२ जुलै) पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यात त्यांनी नुकताच मंत्रालयातील बैठकीसंदर्भात झालेल्या महापौरांच्या निमंत्रणावरील वादावरही भाष्य केलं. २९ जूनला अजित पवारांनी पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात मुंबईत मंत्रालयात बैठक बोलावली होती, परंतु बैठकीला पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना बोलावलं नाही आहे. यामुळे नाराजीचं एक ट्विट मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.
अशी चूक पुन्हा होणार नाही
पुण्याचे प्रथम नागरिक, महापौर मुरलीधर मोहोळ ह्यांनी आपल्या ट्विट द्वारे मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत अजित पवारांनी आमंत्रण न दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. या ट्विटवर पवारांचं म्हणणं काय होता ह्यावर सगळ्यांचं लक्ष होता. आता पवार यांनी या मुद्यावर भाष्य केलं आहे. “पुण्याचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांचा मान असतो. मी स्वतः पुण्याचा नागरिक आहे. त्यामुळे यापुढे असं होणार नाही,” असं आश्वासन अजित पवार यांनी यावर दिलं आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांचा आढावा घेतला. ऑक्सिजन क्षमतेत वाढ करण्यासोबतच जिल्ह्यानं ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण व्हावं, असं सूचित केलं. ग्रामीण भागातील उपचार सुविधा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यावर सरकारचा भर आहे. pic.twitter.com/2uFQr4LZSZ
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 2, 2021
मी स्वतः महापौरांना बोलवलं होतं, मात्र बातम्या वेगळ्या आल्या
अजित पवार म्हणाले की, “मुंबईतील बैठकीला मी स्वतः महापौरांना बोलवलं होतं. मात्र बातम्या वेगळ्या आल्यात. प्रथम नागरिक या नात्याने महापौरांचा मान असतो. त्यासंदर्भात काही गैरसमज झालेत. यापुढे असं होणार नाही असा आदेश प्रशासनाला दिला आहे. मी पुण्याचा नागरिक आहे. त्यामुळे यापूढे असं होणार नाही.”
मोहोळांनी ट्विट करत व्यक्त केली नाराजी
‘महापौर म्हणून मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण आपल्याला नाही, हे व्यक्तिशः मलाच नाही, तर पुणेकरांना डावलल्यासारखं आहे. कोरोना संकटाशी सामना करताना शहराचं हित लक्षात घेऊन आणि राज्य सरकारची भरीव मदत महापालिकेला नसतानाही आपण कधीही राजकारण केलं नाही.उलट मी कोरोनाबाधित असल्याचा काळ वगळता जवळपास सर्वच बैठकांना उपस्थित राहून आणि समन्वय ठेऊन पुढे जात राहिलो. मात्र या महत्त्वाच्या बैठकीलाच आपल्याला जाणीवपूर्वक सहभागी करुन न घेणे, हे पुणेकर चांगलंच लक्षात ठेवतील’.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.