HW News Marathi
Covid-19

यंदा गणेशोत्सवासाठी मंडळातील मुर्ती ४ फुट तर घरातील बाप्पा २ फुटांचा!

मुंबई । संपूर्ण महाराष्ट्राला गणेशोत्सवाचे वेध लागले होते मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही गणेश उत्सवावर कोरोनाचं संकट कायम आहे. त्यामुळे सरकारकडून गणेशोत्सवासंदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या

आणि आज शेवटी राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लावले आहेत. येत्या काही महिन्यात बाप्पाचे आगमन होणार असून राज्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो.

या निमित्ताने नातेवाईकांच्या घरी येणं जाणं होतं. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. गृह विभागाकडून या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे मागील वर्षात नियमावळी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार यंदाही मार्गदर्शक तत्वांचं आता पालन करावं लागणार आहे.

काय आहे नियमावली?

गृह विभागाच्या सूचनेनुसार, सरकारने गणेश मूर्तीची उंची जाहीर केली आहे. घरगुती गणेशाची मूर्ती ही २ फूट तर सार्वजनिक मंडळासाठी ४ फूटांच्या मूर्तीची परवानगी असणार आहे.

गणेशोत्सवाबाबत परवानगी महत्वाची

१)कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.

२) विसर्जन कृञिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी.

३)नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी.

४)शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी.

५) सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत.

६)आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी.

७) नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे.

८) गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी मतदारसंघात ६८ टक्के मतदान

News Desk

हरिद्वारमधील कुंभमेळ्यासाठी भक्तांनी गंगा नदी काठी केली तोबा गर्दी

News Desk

राज्याचे दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण

News Desk