मुंबई।राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईतील रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती पुढे येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाले असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे रुग्णालयात दाखल झाल्याने आता वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्यात.
उद्धव ठाकरे हे मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात आज (२९जून) ला सकाळीच दाखल झाले. मुख्यमंत्री मात्र कशासाठी रुग्णालयात गेले याची अधिकृत माहिती समोर आली नव्हती. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात गेल्याचं सांगण्यात येतंय.
उद्धव ठाकरे हे स्वत: ड्रायव्हिंग करत पोहोचले
विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे स्वत: ड्रायव्हिंग करत रुग्णालयात गेल्याने उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे. केवळ रुटीन चेकअप म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रुग्णालयात दाखल झाले. यापूर्वी मुख्यमंत्र्यांचं रुटीन चेकअप हे लीलावती रुग्णालयात होतं होत. मात्र आता उद्धव ठाकरे हे सध्या वर्षा बंगल्यावर असल्याने जवळचं रुग्णालय म्हणून, मुख्यंत्र्यांनी रिलायन्स रुग्णालय निवडलं.
रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार झाले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री स्वत:ही रुटीन चेकअपसाठी याच रुग्णालयात पोहोचले.तासाभराचं रुटीन चेकअप झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रुग्णालयातून रवाना झाले. दरम्यान, मुख्यमंत्री येत असल्याने रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.