HW News Marathi
व्हिडीओ

‘अजित पवार मुर्दाबाद’ म्हणणाऱ्यांना सुप्रिया सुळे म्हणाल्या…

पुण्यातील आंबिल ओढ्यावरील घरांवर पुणे महापालिकेने 4 जून रोजी कारवाई केली होती. पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले होते. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला होता. तसेच यावेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न झाला. काही घरं पाडल्यानंतर या पाडकामाला कोर्टाने स्थगिती दिली आहे…दरम्यान, आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या पुण्यात दुसऱ्य़ाच एका आंदोलनासाठी आल्या होत्या मात्र तिथे आंबिल ओढ्याच्या प्रश्नासाठी वंचित बहुजन आघाडीने स्थानिकांच्या मदतीने आंदोलन केलं होतं. वंचित बहुजन आघाडी आणि आंबिल ओढ्यातील महिला आंदोलनात सहभागी झाल्या. यावेळी सुप्रिया सुळेंनी खाली बसून आंदोलक महिलांसोबत सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. मात्र त्याचवेळी वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या समोरच अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. “मुर्दाबाद मुर्दाबाद अजित पवार मुर्दाबाद” अशा घोषणा चक्क सुप्रिया सुळे यांच्या समोरच दिल्या जात होत्या.. इतकंच नाही तर अजित पवारांच्या सांगण्यावरुन हे सगळं झाल्याचा आरोप केला जात आहे..त्यालाही सुप्रिया सुळेंनी सडेतोड उत्तर दिलं हे..काय म्हणाल्या सुप्रिया सुळे पाहूयात…

#supriyasule #ajitpawar #SharadPawar #Pune #maharashtra #ncp

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP चे मुख्य चेहरे बाहेर पडताहेत व भ्रष्टाचाराचे, खंडणीचे आरोपी पक्षाचे चेहरे झालेत – Sanjay Raut

News Desk

इंग्रजीतून Budget सादर झाल्याने Bacchu Kadu नाराज

Manasi Devkar

बीडमध्ये महाविकासआघाडीत बिघाडी!; स्थानिक MLA मुळे Ajit Pawar यांच्या कार्यक्रमाला सेनेचा कडाडून विरोध

News Desk