HW News Marathi
महाराष्ट्र

‘वाघ आमच्या इशाऱ्याने चालतो’, वडेट्टीवारांचा ठाकरे सरकारला घरचा आहेर 

पुणे | राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल (२७ जून) लोणावळा येथील ओबीसी चिंतन बैठकीत शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. मंचावरील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडे पाठवा असं सांगितलं. त्यावर वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, मी अशा भागातील राहतो जेथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे मी माझ्या खात्यात पैसे आले तर परत जाऊ देणार नाही, असं म्हटलं आहे. यावर मंचावर बसलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडेही पाठवा असं म्हटलं होतं. यावर विजय वडेट्टीवारांनी आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे, असं म्हणत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला आहे.

“जेवढे पैसे सारथी मिळतील, तेवढेच पैसे महाज्योतीला मिळतील, मी बसलोय इथे”

“कोरोना लाट गेली की ओबीसींचा पहिला विराट मोर्चा औरंगाबाद येथे होणार आहे,” अशीही घोषणा यावेळी विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केली. तसेच जेवढे पैसे सारथी मिळतील, तेवढेच पैसे महाज्योतीला मिळतील. मी बसलोय इथे, असं म्हणत ओबीसींसाठीच्या निधीसाठी त्यांनी दंड थोपटले आहेत. विजय वडेट्टीवार पुढे असंही म्हणाले की, “मी गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य आहे. पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू आहे. ओबीसींवर अन्याय झालाय. तुम्ही आम्ही एकत्र आलो तर हा अन्याय दूर होईल. प्रस्थापितांच्या विरोधात लढणे सोपं नाही. बावनकुळे साहेब, माझा नेता ओबीसी आहे, त्यामुळे मला तिकीटाची भिती नाही. मी समाजासाठी झुकायला आणि वाकायला तयार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिकमधील मालेगाव शहरात कोरोनाचा पहिला बळी

News Desk

एकनाथ खडसे बॉम्बे रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर!

News Desk

‘..तेव्हा संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते’, नितेश राणेंचा संजय राऊतांवर निशाणा

News Desk