HW News Marathi
महाराष्ट्र

बार मालकांकडून वसूल केलेले ३ कोटी देशमुखांनी संस्थेच्या नावे वळवले, EDचा मोठा खुलासा

मुंबई | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान ईडीने गंभीर असा आरोप केला आहे की, निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरुन डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये मुंबईच्या काही पब्स, बारच्या मालकांकडून चार कोटीहून अधिक वसुली केली.

ईडीच्या म्हणण्यानुसार वाझेने देशमुखांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना हे पैसे दिले. त्यानंतर ह्या पैश्यातला एक वाटा दिल्लीतल्या चार शेल कंपन्यांच्या माध्यमातून नागपूरातल्या एका चॅरिटेबल ट्रस्टकडे वळवण्यात आला आहे. शुक्रवारी ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपुर येथील घरी आणि मुंबईच्या घरी छापेमारी केली होती.

मुंबईतील बार, पब यांच्या मालकांकडून उकळलेल्या ४.७० कोटी रुपयांपैकी ३.१८ कोटी रुपये देशमुख यांनी त्यांचा मुलगा ऋषिकेशच्या माध्यमातून नागपूरच्या श्री साई शिक्षण संस्था ट्रस्ट या संस्थेत फिरवले. संस्थेत देणगी स्वरुपात ही रक्कम जमा झाल्याचा आभास निर्माण करण्यासाठी आधी ही रक्कम दिल्लीतील दोन व्यक्तींना हवालाद्वारे पोहोचवली गेली. नंतर या दोन व्यक्तींच्या नावे नोंद बोगस कंपन्यांच्या खात्यातून ही रक्कम संस्थेत वळविण्यात आल्याचा दावा ईडीने विशेष न्यायालयात केला. या व्यवहारांमध्ये देशमुख यांचा स्वीय सहायक कुंदन शिंदे प्रत्यक्ष सहभागी असल्याचेही एनआयएने न्यायालयाला सांगितले आहे.

सचिन वाझे यांनी दिलेल्या जबाबात देशमुख यांनी काही प्रकरणांच्या तपासाबाबत थेट सूचना दिल्याचे सांगितले. तसेच एका बैठकीत देशमुख यांनी शहरातील बार, पब आदी आस्थापनांकडून महिन्याकाठी तीन लाख रुपये गोळा करण्यासही सांगितले. त्यासाठी शहरातील बार मालकांची बैठक घेतली.

२०२१ मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दक्षिण, मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरांतील ऑर्केस्ट्रा बारकडून एक कोटी ६४ तर पश्चिम उपनगरांतील आस्थापनांकडून दोन कोटी ६६ लाख रुपये गोळा केले. त्याशिवाय गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात जया पुजारी आणि महेश शेट्टी या बार मालकांनी इतरांच्यावतीने ४० लाख रुपये ‘गुड लक’ म्हणून दिले होते. ही सर्व रक्कम देशमुख यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे यांच्या हवाली केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बी एच आर मुळे हजारोंचे संसार उध्वस्त झाले ! एकनाथ खडसे

News Desk

HW Exclusive : हे सरकार चोऱ्या करायला बसले; पडळकरांचे सरकारवर हल्लाबोल

Aprna

“किती वर्ष महाराष्ट्रातल्या लोकांची फसवाफसवी?” – सोमय्या

News Desk