HW News Marathi
Covid-19

फडणवीसांनी खुशाल हवे ते गौप्यस्फोट करावेत ! । शरद पवार

पुणे । राज्याच्या २ दिवसीय पावसाळी अधिवेशनावर विरोधीपक्ष असलेला भाजप तीव्र नाराज आहे. भाजपच्या नेत्यांकडून सरकारवर या मुद्द्यांवरून जोरदार टीका होत आहे. “मी गौप्यस्फोट करणार हे या सरकारला ठाऊक आहे म्हणून हे सरकार पळ काढत आहे”, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या आरोपाला आता थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. इतकेच नव्हे तर शरद पवारांनी यावेळी फडणवीसांना एक सल्लाही दिला आहे.

पुण्यात बोलताना आज (२५ जून) शरद पवार म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांना जे काही गौप्यस्फोट करायचे आहेत ते खुशाल करावेत. महाराष्ट्रात मीडिया अजून शिल्लक आहे. त्यांच्या माध्यमातून काय गौप्यस्फोट करायचे आहेत ते करा. पण या कारणासाठी राज्याला वेठीला धरू नका. राज्यात कोरोनास्थिती आहे. म्हणूनच अधिवेशनाचा कालावधी कमी करावा लागतो आहे. केंद्राने देखील संसदेच्या अधिवेशनाबाबत हेच केले. लक्षात घ्या”, असे शरद पवार देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले.

तसेच ओबीसी आरक्षणासाठी भाजपने चक्काजामची हाक दिली आहे. याविषयी बोलताना टोला लगावत शरद पवार म्हणाले की, “पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सांगत आहेत की आंदोलन करू नका, आंदोलनांपासून लांब राहा आणि राज्यातले त्यांचेच भक्त आता आंदोलन करणार आहेत.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईमध्ये आठवडाभरात ५०० आयसीयू बेड्स नव्याने उपलब्ध होणार

News Desk

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ‘वर्षा’वर बोलावली बैठक, लॉकडाऊन की कडक निर्बंध?

News Desk

मुंबईतील पुढील आठवड्याचं लसीकरण जाहीर, थेट केंद्रावर येणाऱ्यांना देणार लस

News Desk