HW News Marathi
महाराष्ट्र

‘पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्तांच्या नेमप्लेटवर शाईफेक!’

पिंपरी चिंचवड। पिंपरी चिंचवड मध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकल्या प्रकरणी अटकेत असलेल्या भाजप नगरसेविकेची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. नगरसेविका आशा शेंडगे यांच्यासह त्यांच्या 11 समर्थकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची रवानगी पुणे येथील येरवडा कारागृहात करण्यात आल्याची माहिती आहे.

काय घडलं नेमकं?

पिंपरी चिंचवडमधील कासारवाडीत गणेशोत्सवाच्या काळात भूमिगत गटारांच्या बांधकामासाठी रस्ते खोदकाम केले जात आहे. यामुळे रहदारीला अडथळा ठरतो, असे सांगत आशा शेंडगे यांनी पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि स्मार्ट सिटीचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांच्या महापालिका कार्यालयातील नामफलकावर शाई फेकली होती.

खोदकाम थांबवण्याचे आश्वासन दिले

रस्ते खोदकामाच्या मुद्द्यावर आशा शेंडगे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याशी चर्चा केली होती, तेव्हा त्यांनी खोदकाम थांबवण्याचे आश्वासन दिले होते. असे असतानाही स्मार्ट सिटीच्या कामांसाठी खोदकाम सुरू करण्यात आले. स्मार्ट सिटीचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांना विचारले असता, त्यांनी मात्र खोदकाम होणार असल्याचे स्पष्ट केले होते.

नेमकं काय घडलं?

येथे पोहोचल्यानंतर महिलांसोबत बसून त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. काही महिलांनी शाईची बाटली आणली होती. भालकर यांच्या चेहऱ्याला शाई फासण्याची त्यांची योजना होती, असे सांगितले जात आहे. मात्र ते भेटले नाहीत, आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शेंडगेंना महापालिका आयुक्तांना भेटू दिले नाही, तेव्हा महिलांनी त्याच्या नेमप्लेटवर शाई फेकून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

त्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या नंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता नगरसेविका आशा शेंडगे यांच्यासह त्यांच्या 11 समर्थकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSC बाबत मुख्यमंत्री लवकरचं मोठी घोषणा करणार!

News Desk

शरद पवारांचा खडसेंच्या भेटीवर खुलासा!

News Desk

राष्ट्रीय मतदार दिनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पुरस्कार जाहिर; ठाणे जिल्ह्याला २ पुरस्कार

News Desk