HW News Marathi
देश / विदेश

“अनिल परब आणि मिलिंद नार्वेकरांचीही CBI चौकशी करा”

मुंबई । माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी आज (२५ जून) ईडीने छापेमारी केली. यावरून विरोधी पक्ष आणि महा विकास आघाडी सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका दिसत आहेत. आता अनिल देशमुखांची काही दिवसांनी तुरूंगात रवानगी होणार आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. किरीट सोमय्या यांनी यावेळी मंत्री अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर देखील टीका करण्याची संधी सोडली नाहीये.

अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांचीही चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केलीये. अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच अनिल परब यांची अवस्था होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्या यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत पत्रकार परिषदेमध्ये भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये हे देखील उपस्थित होते

अनिल परब नंतर मिलिंद नार्वेकरांना यांना पण त्याच वाटेवर जावं लागणार आहे. मिलिंद नार्वेकरांनी दापोली-मुरूड किनाऱ्यावर अनिल परब यांच्या घरापासून काही फुटाच्या अंतरावर भव्य बंगला बांधण्यास सुरूवात केली आहे. समुद्र किनाऱ्यावरील साडेचारशे झाडं कापली असल्याचंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.

महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानकडून मसूद अझरची पाठराखण, म्हणे तो घराबाहेर देखील पडू शकत नाही

News Desk

अमित शहांना गृहमंत्री पदावरून हटवा, राष्ट्रपतींकडे सोनिया गांधींची मागणी

swarit

निपाह व्हायरसची दहशत, दिल्‍ली, गोवा, राज्यस्‍थानमध्ये सतर्कतेचा इशार

News Desk