HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यातील कोरोनाच्या आढावा बैठकीला अजित पवारांची दांडी, चर्चांना उधाण

पुणे | दर आठवड्यात शुक्रवारी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जातो. मात्र, आजच्या (२५ जून) पुण्यातील कोरोना आढावा बैठकीला पुण्याचे पालकमंत्री अजित पवार गैरहजर होते. पुण्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक कौन्सिल हॉल येथे ही पार पडली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक घेतली गेली. बैठकीला पालकमंत्री अजित पवार उपस्थित नसल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. कालच वाझे प्रकरणात अजित पवार यांची CBI चौकशीची मागणी करण्यात आली. तर दुसरीकडे पुण्यातील आंबिल ओढा प्रकरणातील विकासक अजित पवारांचा निकटवर्तीय असल्याचं बोललं जात आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी करावी, असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडला गेला होता. तो प्रस्ताव मंजूरही करण्यात आला होता. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब संदर्भात अजित पवार आणि अनिल परब यांची चौकशी करण्याची मागणी केली होती.

अनिल देशमुखांच्या घरावर ईडीची छापेमारी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले आहेत. सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु आहे. इतकंच नाही तर त्यांच्या मुंबईतील घरावरही छापेमारी केली आहे. दरम्यान कारवाई दरम्यान अनिल देशमुख सध्या नागपुरात नाहीत, शिवाय ते मुंबईतही नसल्याचं कळतं. अनिल देशमुख दिल्लीत असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणात अनिल देशमुख यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आज ईडीने त्यांच्या नागपुरातील घरात छापेमारी सुरु केली आहे. ईडी वेगवेगळे कनेक्शन या प्रकरणात तपासू पाहत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१२ आमदारांच्या नियुक्तीला विलंब लावणं हे राज्यपालांना कितपत मान्य आहे – जयंत पाटील

News Desk

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे 2 दिवसांत पंचनामा करण्याचे आदेश

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत – संजय राऊत  

News Desk