HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात आज ३,०७५ रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट ९७.०५ टक्के!

मुंबई। गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा ओसरताना दिसत आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर गेल्या काही दिवसात रुग्ण संख्येत किंचित वाढ झाली होती. राज्यातही अशीच काहीशी स्थिती गेल्या काही दिवसात पाहायला मिळत आहे. मात्र आज राज्यात करोना रुग्णसंख्या कमी झाल्याचं दिसत आहे. गेल्या २४ तासात राज्यात ३ हजार ७५ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या आज नोंदवली गेली आहे. दुसरीकडे ३ हजार ५६ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख २ हजार ८१६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.०५ टक्के इतकं झालं आहे. राज्यात दिवसभरात ३५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.१२ टक्के इतका आहे. राज्यात आता ४९ हजार ७९६ रुग्ण सक्रीय आहेत.

२३ लाख ७४ हजार ४९७ वर पोहोचली आहे

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५८ लाख ३६ हजार १०७ रुग्णांपैकी ६४ लाख ९४ हजार २५४ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे करोना पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण हे ११.६३ टक्के इतकं आहे. सध्या राज्यात २ लाख ९५ हजार ७७२ रुग्ण होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर १,९५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.देशात गेल्या २४ तासांमध्ये देशात ३३ हजार ३७६ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या तीन लाख ९१ हजार ५१६ झाली आहे. तर काल दिवसभरात ३२ हजार १९८ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता तीन कोटी २३ लाख ७४ हजार ४९७ वर पोहोचली आहे. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर गेल्या ७८ दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचा साप्ताहिक दर सातत्याने तीन टक्क्यांच्या खालीच आहे.

लसीकरणाचा वेग अधिक असल्याचं दिसत आहे

देशात आतापर्यंत सहा लसींना परवानगी देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन जॉन्सनच्या सिंगल डोस आणि झायडस कॅडिलाच्या तीन डोस असलेल्या ‘झायकोव्ह-डी’ या लसींना परवानगी दिली आहे. यामुळे देशात लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. शहरी भागांसह ग्रामीण भागातही लसीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. जगभरातल्या अनेक देशांपेक्षा राज्यातला लसीकरणाचा वेग अधिक असल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारने याबाबतची आकडेवारी दिली आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि हरयाणात सर्वाधिक लसीकरण होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोदावरी, प्राणहिता पाणलोट क्षेत्रात नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

Aprna

करुणा शर्मा कोल्हापूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात

Aprna

स्वपक्षाच्या उमेदवाराविरोधात मतदान करून सेनेला ‘जोर का झटका’

News Desk