HW News Marathi
Covid-19

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू करणार!

कोल्हापूर | महाराष्ट्र शासन निर्णय देण्यास विलंब लावत आहे. तसेच जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी येत आहे त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू करणार असल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले. जिल्हयाचा पॉझिटिव्हिटी रेट चार दिवसांपूर्वी जास्त तर शहराचा रेट कमी होता. या आधारावर शहर व जिल्हा असे वर्गीकरण करून शहरातील दुकाने सुरू करण्याची मागणी चेंबर ऑफ कॉमर्सने पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली होती. ना. पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन दिले आहेत.

मात्र, दोन दिवस अद्याप कोणतीच चर्चा झाली नाही. त्यातच जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट दोन दिवसांपासून कमी आला आहे. बुधवारी सर्वाधिक 33 हजार जणांचे टेस्टिंग झाले. जिल्ह्याचा बुधवारचा पॉझिटिव्हिटी रेट 5.12 आहे. तर गेल्या आठवडयातील शुक्रवार ते बुधवार या सहा दिवसांचा रेट 8.05 इतका आहे.दररोजचा दर कमी होत असल्याने आम्ही शासनाच्या आदेशाची वाट न पाहता सेामवारपासून सर्व दुकाने खुली करणार असल्याचे सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगली जिल्ह्यात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन,जयंत पाटलांची घोषणा !

News Desk

पुण्यातील १८ वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लसीकरणाची परवानगी द्यावी, अजित पवारांची केंद्राकडे मागणी  

News Desk

माजी मंत्री सदाभाऊ खोत कोरोना पाॅझिटिव्ह !

News Desk