दिल्ली।भारतीय बँकांना चुना लावून परदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना मोठा दणका दिला आहे. या तिघांची मिळून ९३७१कोटी रुपयांची संपत्ती बँकांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने तिघांची १८ हजार १७० कोटींची मालमत्ता जप्त केली होती. यापैकी ९ हजार ३७१ कोटींची संपत्ती ईडीने कर्ज बुडवण्यात आलेल्या सार्वजनिक बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित केली आहे. ईडीने ट्वीट करून या संपत्ती हस्तांतरण प्रक्रियेबद्दल माहिती दिली आहे.
ED not only attached/ seized assets worth of Rs. 18,170.02 crore (80.45% of total loss to banks) in case of Vijay Mallya, Nirav Modi and Mehul Choksi under the PMLA but also transferred a part of attached/ seized assets of Rs. 9371.17 Crore to the PSBs and
Central Government.— ED (@dir_ed) June 23, 2021
तर अंमलबजावणी संचालनालयने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी उद्योगपती विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची १८ हजार १७० कोटींची संपत्ती निवारण अधिनियम २००२ अर्थात पीएमएलए कायद्यातंर्गत १८ हजार कोटींची संपत्ती जप्त केली होती. या संपत्तीपैकी ९ हजार ३७१.१७ कोटींची संपत्ती कर्ज बुडवलेल्या सार्वजनिक बँकांकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. ‘ईडी’कडून या तिघांच्याही देश-विदेशातील मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या एकूण मालमत्तेपैकी ९६९ कोटींची मालमत्ता ही परदेशात आहे.
२२ हजार कोटींचा बँकिंग फ्रॉड
विजय मल्या, नीरव मोदी आणि मेहूल चौक्सीने मिळून सरकारी बँकांचे २२ हजार कोटींहून अधिक रक्कमेचा घोटाळा केला होता. CBI द्वारे FIR केल्यानंतर ED ने कारवाई करीत डोमॅस्टिक आणि इंटरनॅशनल देवाण घेवाणीची चौकशी करीत अब्जावधींची संपत्ती जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण संपत्तीपैकी ९६९ कोटी रुपयांची संपत्ती विदेशात आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.