HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यसभेतील राजीव सातवांच्या रिक्त जागी पृथ्वीराज चव्हाणांना संधी द्या!

मुंबई | कॉंग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या अकाली मृत्यूमुळे कॉंग्रेस पक्षात आणि देशाच्या राजाकणात मोठी दरी निर्माण झाली. अशात राजीव सातव यांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर कोणाला नेमायचे याची चर्चा आता सुरु झाली आहे. दरम्यान, राजीव सातव यांच्या या रिक्त जागेवर माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना संधी द्यावी अशी मागणी पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ बसवेश्वर चेणगे यांनी केली आहे.

यासंदर्भात चेणगे यांनी कॉंग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, कॉंग्रेस नेते आणि खासदार राहूल गांधी यांना पत्र लिहित ही मागणी केली आहे. या पत्रात असं लिहिलं आहे की, महाराष्ट्रात आदर्श घोटाळ्यामुळे पक्षाची प्रतिमा ही संभ्रमाची झाली होती. तेव्हा पक्षाच्या आदेशावरुन पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रीय राजकारणातून राज्यात आले. त्यांच्या रुपाने राज्याला निष्कलंक व चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्व असलेले मुख्यमंत्री लाभले. यामुळे कॉंग्रेसची प्रतिमा उजळून निघाली.

आरोग्य, उद्योग, अर्थ, सहकार, शिक्षण, पर्यटन अशा अनेक क्षेत्रात त्यांनी काम केलं. शिवाय पक्षाने सोपवलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी नीट पार पाडल्या. यामुळे राजीव सातव यांच्या रिक्त जागी त्यांची वर्णी लावावी अशी मागणी केली आहे. ही मागणी पुर्ण होणार का? राज्यसभेत पृथ्वीराज चव्हाणांची वर्णी लागणार का हे पाहणे येत्या काळात महत्वाचं असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्ता येण्याची भविष्यवाणी खरी होत नाही म्हणून भाजपची तारीख पे तारीख, राष्ट्रवादीचा टोला

News Desk

भंडाऱ्यात जिल्हा रुग्णालयात आग, १० बाळांचा दुर्दैवी मृत्यू

News Desk

भीमा-कोरेगाव दंगली प्रकरणी, सुधीर ढवळेंसह दोन जणांना अटक

News Desk