पंढरपूर | । पंढरपूरात होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी कलम १४४च्या अंतर्गत संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. या काळात चंद्रभागा परिसरात १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. तर सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकेबंदी लागू करण्यात येणार आहे. १७ जुलै ते २५ जुलै या काळात पंढरपूरात कलम १४४ लागू राहणार आहे. परवानगी नसलेल्या भाविकांना सोलापूर जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. २० जुलै रोजी यंदाची आषाढी एकादशी आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही भाविकांना पंढरपूर यात्रेला जाता येणार नाहीये.
एकादशी दिवशीचा रथोत्सवासाठी रथाऐवजी स्वतंत्र वाहनाने १० मानकरी आणि मंदिर समितीचे ५ कर्मचारी असे १५ व्यक्ती येतील. यावेळी सोशल डिस्टन्सिंग च्या नियमांचं करण बंधनकारक असेल तर संताच्या पादुका भेटीदरम्यान मानाच्या पालखी सोहळ्यातील ४० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तर वारीसाठीच्या २ बसमध्ये प्रत्येकी २० असे ४० वारकऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.
तर २० जुलैला आषाढी एकादशी आहे. मात्र प्रशासनाने १७ जुलै ते २५ जुलै असे नऊ दिवस पंढरपूरात संचार बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संचारबंदी पंढरपूर आणि आजूबाजूच्या दहा गावात लागू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता त्या प्रस्तावाला आता शासनाने हिरवा कंदील दिला आहे. पंढरपूरात गेल्यानंतर चंद्रभागेत आंघोळीसाठी भाविकांची मोठी गर्दी असते त्यामुळे चंद्रभागा नदीच्या परिसरात १४४ कलमातंर्गत संचार बंदी लागू करण्यात येणार आहे. ज्या लोकांना शासनाने परवानगी दिली आहे त्याच लोकांना पाच दिवस पंढरपूरात येण्याची परवानगी देण्यात आली आहे.
१० मानाच्या पालख्या कोणत्या?
१- संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)
२- संत तुकाराम महाराज (देहू)
३- संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)
४- संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)
५- संत सोपान काका महाराज (सासवड)
६- संत नामदेव महाराज (पंढरपूर)
७- संत एकनाथ महाराज पैठण
८- रुक्मिणी माता (कौडानेपूर) अमरावती
९- संत निळोबाराय (पारनेर अहमदनगर)
१०- संत चांगटेश्वर महाराज (सासवड)
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.