HW News Marathi
देश / विदेश

शरद पवारांसोबतच्या बैठकीत नक्की काय चर्चा झाली?, प्रशांत किशोरांचा खुलासा

नवी दिल्ली | निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाविरोधात लढणाऱ्या विरोधी पक्षासंदर्भात महत्वाचं भाष्य केलं आहे. काल (२१ जून) दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर एनडीटीव्हीशी बोलताना प्रशांत किशोर यांनी सध्या सत्तेत असणाऱ्यांना तिसरी किंवा चौथी आघाडी काही आव्हान निर्माण करु शकते असं मला वाटत नाही, असं मत व्यक्त केलं.

तसेच सोमवारी (२१ जून २०२१ रोजी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती प्रशांत किशोर यांनी दिली आहे.भाजप विरोधात देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत तिसरी आघाडी तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी प्रशांत किशोर यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. यावर प्रशांत किशोर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाष्य केले आहे. भाजप विरोधात मी तिसऱ्या आणि चौथ्या आघाडीवर विश्वास ठेवू शकत नसल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

प्रशांत किशोर म्हणाले की, देशात भाजप विरोधात जाण्यासाठी तिसरी आणि चौथी आघाडी आव्हान देईल का? यावर मला शंका आहे. मी तिसऱ्या आणि चौथ्या आघाडीवर विश्वास ठेवू शकत नाही. ही आघाडी भाजपचे आव्हान पेलेल यावर माझा विश्वास नाही. विरोधी आघाड्यांना भाजप विरोधात यश मिळणे कठीण आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांकडून ‘मिशन २०२४’ मध्ये भाजपला घेरण्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचे बोललो जात आहे. किशोर यांच्या मते देशात तिसऱ्या आघाडीचा पर्याय हा जुना झाला आहे. सध्याच्या राजकीय अनुमानानुसार तो सुसंगत ठरू शकत नाही.

प्रशांत किशोर यांचे म्हणणे आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माझी भेट ही फक्त एकमेकांना जाणण्यासाठी आहे. यापूर्वी आम्ही कधीही एकत्र काम केले नाही. भाजपविरूद्धच्या लढाईत कोणत्या पद्धतीने काम करता येईल तसेच कोणत्या राज्यात कशापद्धतीने राजकीय रणनिती आखता येईल याबाबत आम्ही सविस्तर चर्चा केली आहे. याचबरोबर ममता बॅनर्जी यांच्या विजयाने आपणही आपल्या राज्यात भाजप विरोधी लढू शकतो.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची ही दुसऱ्यांदा भेट झाली. देशात तिसरी आघाडी तयार करण्यासाठी या बैठका होत असल्याचे शक्यता वर्तवल्या जात आहेत. काल दिल्लीत आणि मागच्या आठवड्यात ११ जून रोजी मुंबईतील शरद पवारांच्या निवासस्थानी प्रशांत किशोर यांची ३ तास बैठक चालली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनापासून वाचण्यासाठी पंतप्रधान करणार जनआंदोलन!

News Desk

‘सगळे कर्ज फेडतो पण कोर्ट केस बंद करा’

News Desk

Gandhi Jayanti : गांधींच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींचा खास लेख

News Desk