HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार-मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक, राज्यातील कोणत्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा?

मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा या ठिकाणी ही भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर बैठक झाली. यावेळी शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं 2 कोटी 36 लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.

रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं 2 कोटी 36 लाखांचा चेक मुख्यमंत्री सहायता निधीसाठी

शरद पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीत राज्यातील पूरपरिस्थिती, कोरोना परिस्थिती, 12 आमदारांचा मुद्दा, ओबीसी राजकीय आरक्षण, राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीचे धाडसत्र, महाविकास आघाडीतील समन्वय, छगन भुजबळ यांना मिळालेली क्लिनचीट या मुद्यांवर चर्चा झाली. तसंच यावेळी शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं 2 कोटी 36 लाखांचा चेक मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे दिला.

विविध मुद्द्यांवर चर्चा

या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. अजूनही राज्यपाल नियुक्त 12 विधानपरिषद सदस्यांचा प्रश्न मिटलेला नाही. त्यामुळे या भेटीत या मुद्द्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित होती. यामध्ये राज्यातील पूर परिस्थिती, कोरोना आढावा, ओबीसी राजकीय आरक्षण, राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीचे धाडसत्र आणि महाविकास आघाडीतले समन्वयाचे मुद्दे अशा विषयांवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी राष्ट्रवादीची बैठक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार, आजी-माजी आमदार आणि विधानसभा निवडणुकीत तिकिट दिलेले 114 उमेदवार उपस्थित होते. यावेळी पवारांनी सर्वांकडून मतदारसंघाचा आढावा घेतला. तसेच त्यांच्या तक्रारी आणि सूचनाही जाणून घेतल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोणाला माहित होतं ५५- ५४ आमदारांवर मुख्यमंत्री होईल – संजय राऊत

News Desk

मुख्यमंत्री फडणवीस सर्वात बालीश: शरद पवार

News Desk

अधिकार्‍यांना हाताशी धरून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न फडणवीस हे करत आहेत – नवाब मलिक

News Desk