मुंबई। किरीट सोमय्या हे गुरुवारी ९ सप्टेंबर ला बारामतीत जात आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांचे स्वीय सहायक, प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या संपत्तीची माहिती गोळा करण्यासाठी ते बारामतीत जाणार आहेत.सोमय्या बारामतीत येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी दिली. आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री बाळा भेगडे हे देखील किरीट सोमय्या यांच्या सोबत बारामतीत जाणार आहेत तरी यापूर्वी देखील किरीट सोमय्या यांनी छगन भुजबळ यांच्या मालमत्तेची पाहणी केली होती.
सोमय्यांचा बारामती दौऱ्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या
सोमय्यांच्या बारामती दौऱ्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतु हा राजकीय दौरा नसून खरमाटे यांच्याशी संबंधित विषयांसाठी सोमय्या बारामतीत येत आहेत. खरमाटेंच्या संपत्तीच्या चौकशीसाठी सोमय्या यांनी नुकताच सांगलीचा दौरा केला. सांगलीजवळ वंजारवाडी येथील खरमाटे यांच्या फार्म हाऊससमोर त्यांनी सेल्फी घेतली होती.आता बारामतीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात येऊन सोमय्या नेमके काय बोलणार, कोणावर आरोप करणार, याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
याआधी भुजबळांच्या मालमत्तेची पाहणी
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोमय्यांनी छगन भूजबळ यांच्या मालमत्तेवर प्राप्तीकर विभागानं कारवाई केल्याचा दावा केला होता. मात्र, त्यावर भुजबळ यांनी हे आरोप फेटाळून लावत अशी कोणतीही कारवाई झाली नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर किरीट सोमय्या हे नाशिकमध्ये भुजबळांच्या मालमत्तेची चौकशीसाठी दाखल झाले होते. त्यामुळं आता छगन भुजबळ आता सोमय्यांच्या रडारवर होते, त्यानंतर मात्र आता किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांचा छडा लावलाय.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.