HW News Marathi
महाराष्ट्र

“नवरा बायको भांडण झाल्यानंतर एकत्र चहा पितात”, ‘राड्या’वर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

पुणे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून आज(१७ जून) पुण्यात वात्सल्य फाउंडेशन च्या माध्यमातून वंचित मुलींना नवीन ड्रेसचे वाटप करण्यात आले त्यावेळी पत्रकारांशी बोलताना कालच्या शिवसेना आणि भाजप राड्यावर त्यांनी भाष्य केले आहे. विशेष अधिवेशन झालं नाही तर आत्ता तरी पावसाळी अधिवेशनात आरक्षण प्रश्नांवर चर्चा करायला दोन दिवस राखून ठेवावा अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

नवरा बायको भांडतात आणि…

एखाद्या कुटुंबात नवरा-बायको भांडतात आणि मग पुन्हा एकत्र चहा पीत बसतात. राजकारणात एखाद्या घटनेवरून विषय समाप्त होत नाही असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले तर काल शिवसेना भवनासमोर झालेल्या शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हाणामारी बद्दल ते बोलत होते. देशा विरोधी बोलणार यांच्या सुरात तुम्ही का सूर मिसळता असा सवालही पाटलांनी उपस्थित केलाय.

राम मंदिर प्रश्‍नावर सेनेच्या भूमिकेवर देखील त्यांनी टीका केली ” हिंदूंच्या विषयावर बोलायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. इथेच तर दुराव्याला सुरुवात झाली आहे. तुम्ही हिंदुत्व सोडलं सर्वांनी सलोख्याने राम मंदिर बांधायला सुरुवात केली. काँग्रेसने आणि देश विरोधी ताकदीने जे करायचं ते चालवलेले आहेत. त्याला तुम्ही राष्ट्रीय म्हणता तर त्यांना सपोर्ट कसे करता हे क्लेशदायक आहेच.

आरक्षणावर दोन दिवस चर्चेची मागणी

पावसाळी अधिवेशनात आरक्षण प्रश्‍नांवर चर्चा करायला दोन दिवस हवेत अशी मागणी चंद्रकांत पाटलांनी केली ते पुढे बोलताना म्हणालेत, ” जे जे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतील त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत.

विशेष अधिवेशन मागता मागता रुटीन अधिवेशन येऊन गेलं. त्यात कमीत कमी दोन दिवस आरक्षणाच्या प्रश्नांवर चर्चा करायला द्या . दोन तास चर्चा करतात त्या वेळी सगळ्यांना बोलता येत नाही विशेष अधिवेशन असेल तर नीट सूचना देता येतात.

राजकीय गणित जुळण्याच्या शक्यतेवरून चंद्रकांत पाटील म्हणाले,” विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली की रणनीती ठरली पण बाकी मध्यावधी निवडणुका वगैरे पुड्या सोडल्या जातात.१८ महिन्यात एक दिवसही असा केला नसेल की नवीन गणित मांडली गेली नाहीत.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Aprna

टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शंभर शाळा डिजिटल आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्प

News Desk

६.८ टक्के विकासदराने १ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था हे दिवास्वप्नच! – नाना पटोले

Aprna