HW News Marathi
महाराष्ट्र

‘…तर आपला काडकन आवाज आला पाहिजे’, बाळासाहेबांचा तो व्हिडीओ महापौरांकडून शेअर!

मुंबई | राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते काल (१६ जून) आमने-सामने आल्याने तुफान राडा झाला होता. दादरला शिवसेना भवनसमोरच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली होती. या घटनेवर दोन्ही पक्षाकडून कडक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ शेअर करत भाजपला थेट इशारा दिला आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी लढण्याचे धडे दिले आहेत. तसेच, त्याचा ‘फटकन आवाज आला तर आपला काडकन आवाज आला पाहिजे. तर तो शिवसैनिक आहे’, असं हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.

शिवसेना भवनसमोरच झालेल्या भाजप शिवसेना कार्यकर्त्यांच्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पेडणेकर यांनी कॅप्शन न देता हा व्हिडिओ शेअर केला आहे. माध्यमांशी बोलताना काल त्यांनी अंगावर याल तर शिंगावर घेऊच, असा इशारा देत शिवसेना भवनावर मोर्चा काढणे कितपत योग्य आहे याचे उत्तर द्या. तुम्हीही काहीही कराल आणि शिवसैनिक गप्प बसणार काय ?, असा संतप्त सवाल उपस्थित केला होता.

“अंगावर याल तर शिंगावर घेऊच” दादरच्या भाजप-सेना राड्यावर महापौरांची प्रतिक्रिया

दादरच्या शिवसेना भवनासमोर शिवसैनिक आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली आहे. या राड्यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांना इशारे देण्यास सुरुवात केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तर अंगावर याल तर शिंगावर घेऊच, असा इशाराच भाजपला दिला आहे. शिवसेना-भाजपमधील धुमश्चक्रीनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा सज्जड इशारा दिला आहे. शिवसेना भवन येथील श्रद्धास्थानासमोर भाजपच्या कोणत्यातरी एका पोरानं उगाच ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. तो शिवसैनिकांनी हाणून पाडलाय, असं सांगतानाच शिवसेना भवनावर मोर्चा काढणं कितपत योग्य आहे याचं उत्तर द्या. तुम्हीही काहीही कराल आणि शिवसैनिक गप्प बसणार काय?, असा सवाल पेडणेकर यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अहो पक्षप्रमुख, खरचं मर्द असाल तर सांगून टाका की शिवसेना  ‘सेक्युलर’ झाली – नितेश राणे

News Desk

आघाडी सरकारच्या काळात सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी | पृथ्वीराज चव्हाण

swarit

जगाला गुड बाय करण्याची वेळ आली, सचिन वाझेंच्या धक्कादायक व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसने उडाली खळबळ

News Desk