HW News Marathi
महाराष्ट्र

‘दुकाने चालवा, पैसे कमवा, बरं चाललंय सरकारचं’, राज ठाकरेंचा सरकारवर हल्ला

पुणे। राज ठाकरेहे सरकारवर निशाणा ठेऊन असतात. लॉकडाऊन लावून सरकारचं बरं चाललं आहे. राज्यात लावलेल्या निर्बंधांमुळे राज ठाकरे यांनी आधीही राज्य सरकारवर टीका केली होती. ते पुण्यात एका कार्यारमात उपस्थित होते तेव्हाही त्यांनी सरकारवर निर्बंधांवरून निशाणा साधला आहे. मोर्चे नाही, आंदोलने नाहीत, कोणतीही झंझट नाही. दुकाने चालवा, पैसे कमवा, बरं चाललंय सरकारचं, असं सांगतानाच सरकारलाच आता निवडणुका नको आहोत, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

काम पटकन होणार असेल तर स्थगिती मान्य

निवडणुका स्थगित ठेवल्या पाहिजे. पण काम पटकन होणार असेल तर स्थगिती मान्य आहे. सरकारच्या फायद्याचं असेल म्हणून आता निवडणुका घेतल्या जात नसतील. यात काही काळंबेरं असेल तर तेही समजून घ्यायला पाहिजे. सरकारलाच या निवडणुका नको आहेत आता. कारण नंतर सरकारच महापालिका चालवणार. कारण त्यावर प्रशासक नेमणार आणि सरकारच सर्व काम बघणार. हे सर्व उद्योगधंदे सरकारचे चालू आहेत. नुसता ओबीसींचा विषय पुढे करून सरकार काही साध्य करतेय असं नको. पण जनगणना वगैरे झाल्यावर निवडणुका घ्यायला काही हरकत नाही, असं राज म्हणाले. सरकारकडे यंत्रणा आहे. त्यामुळे मनात आणलं इम्पिरिकल डेटा किंवा जनगणना हे सर्व होऊ शकतं. ती काही कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.

हे कुठपर्यंत चालणार?

या लॉकडाऊनमुळे जे चाललं ते बरं चाललं असं सर्व सरकारला वाटतंय. आंदोलने नाही, मोर्चे नाही, सरकारच्या विरोधात कोणी बोलायचे नाही, रस्त्यावर कुणी उतरायचे नाही. काही झंझटच नाही. आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकाने चालवा. बरं चाललंय सरकारांचं. केवळ कोरोनाची भीती दाखवली जात आहे. तिसरी चौथ्या लाटेची भीती दाखवली जात आहे. भीती दाखवून सरकार सर्व करत असेल तर हे कुठपर्यंत चालणार?, असा सवालही त्यांनी केला आहे.

गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत?

यावेळी त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्यावरही मनसेची भूमिका स्पष्ट केली. सरकारचे त्या त्या पक्षाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. तिकडे गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवाला गर्दी चालत नाही. नियम असेल तर तो सर्वांना सारखा हवा. तुमच्या पक्षांच्या कार्यक्रमाला गर्दी चालणार. फक्त गणेशोत्सवाला नको. ही कोणती पद्धत?, असा सवाल करतानाच गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे मंडळं ठरवतील. गणेशोत्सव मंडळांशी बोलून चर्चा करू, असं ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपल्याच वहिनीवरती अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितलं होतं? नाव न घेता राणेंचा खळबळजनक आरोप

News Desk

महाराष्ट्रात कोरोना स्टेज २, कोरोनाग्रतांची संख्या ३९ वर

swarit

राणे,नवनीत राणांनंतर आता महाराष्ट्रात ‘राष्ट्रपती राजवटीची’ आठवलेंची मागणी!

News Desk