HW News Marathi
देश / विदेश

भाजप खासदार नारायण राणे दिल्लीला रवाना!

मुंबई | भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचा हा दौरा श. आहे. आगामी निवडणुका पाहता हा दौरा महत्त्वाचा आहे. नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नारायण राणे हे दिल्ली दौऱ्यात भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत.

नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना, मराठा चेहऱ्याच्या निमित्ताने नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. मात्र राजकीय विश्लेषकांना या दाव्यामध्ये तथ्य वाटत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दसरा गेला, आता बळीराजाची दिवाळी तरी गोड करा ! पंकजांनी घेतली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट 

News Desk

पतंप्रधान नरेंद्र मोदींची देहरादूनमध्ये योगासने

swarit

पेट्रोलच्या किंमतीत वाढ कायम, डिझेलच्या किंमती स्थिर

Gauri Tilekar