HW News Marathi
महाराष्ट्र

कृष्णा कारखाना निवडणूक, शरद पवार-पृथ्वीराज चव्हाण भेटीने पुन्हा चर्चेला उधाण

कराड | सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनी भेट घेण्याचं सत्र सुरुच आहे. काल (११ जून) राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेतली. तसेच, माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही काल शरद पवारांची त्यांच्या मुंबईतील सिव्ल्हर ओक बंगल्यावर भेट घेतली. या भेटीत यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना निवडणूकीच्या विषयावर चर्चा झाल्याचं समजत आहे. दरम्यान, पवार-चव्हाण भेटीनंतर राजकीय वर्तृळात चर्चांना उधाण आले आहे.

सातारा व सांगली जिल्ह्यातील कराड, वाळवा अशा काही तालूक्यात सभासद असणाऱ्या यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याची निवडणूक सुरु आहे. या निवडणूकीत डॉ इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनल आणि अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनल एकत्र यावं यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, विजयसिंह पाटील सातत्याने बैठका घेत आहेत. दोन्ही विरोधी पॅनलने एकत्र येत कारखान्याचे विद्यमान चॅअरमन डॉ सुरेश भोसले, भाजपचे नेते डॉ अतुल भोसले समर्थक सहकार पॅनलविरुद्ध महाआघाडीचा प्रयोग व्हावा, यासाठी चव्हाण प्रयत्नशील आहेत.

दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी चव्हाण भेटीला गेले होते. मात्र, या भेटीत कृष्णा कारखान्याच्या निवडणूकीसंदर्भातही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. अद्याप यावर कोणत्या निर्णय झाला नाही आहे. त्यामुळे ही निवडणूक तिरंगा होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मदती ऐवजी नुसतं राजकारण जमतं”, भाजपचा महाविकासआघाडीवर निशाणा

News Desk

#Coronavirus : अकोल्यात कोरोनाबाधिताचा आत्महत्येचा प्रयत्न

News Desk

केंद्रसरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करु नये, राष्ट्रवादीने झापलं

News Desk