मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतातच. प्रत्येक विषयावर त्यांचे असे वेगळे मत असतेच. काही महिन्यांपूर्वी त्यांनी कोरोना लसीबाबत एक ट्विट केलं होतं. आपलं वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली होती. दरम्यान, आता अखेर अमृता फडणवीस यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. आता १८ वर्षांवरील सगळ्यांना कोरोना लस घेता येणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी लस घेतली आहे.
Finally I’ve taken the first dose of #Corona #vaccine !#CovidVaccine pic.twitter.com/1444XbIPeV
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) June 11, 2021
या आधी काय केलं होतं ट्विट?
अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. “आज मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझं वय 45 वर्षे किंवा अधिक हवं होतं असं वाटत आहे. कोरोनाच्या लसीकरणाची वाट पाहत आहे. कोरोना अधिक भयावह आहे” असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून वेगाने लसीकरण सुरू आहे. केंद्र सरकारनं देशात 45 वर्ष वयोगटावरील सर्वांना लसीकरणाला परवानगी दिली आहे.
For the first time in my life I wish I was 45 years or above ….
Waiting to be vaccinated ….
Everyone around me getting stung by #COVID !
Corona with all its variants looks scary like never before ….
#COVID19 #COVIDvaccine #COVIDSecondWave— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 6, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.