HW News Marathi
देश / विदेश

कोणीतरी काढा दिल्यानेच तुमचा आवाज विरोधात ! शिवसेनेची संभाजीराजेंवर टीका

मुंबई । शिवराज्याभिषेक दिनादिवशी संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आपली पुढची भूमिका जाहीर केली आहे. येत्या १६ जून रोजी कोल्हापूरातून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, संभाजीराजेंच्या या भूमिकेनंतर आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. “संभाजीराजेंचे हे आंदोलन नेमके कोणाच्या विरोधात आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या का?” असा सवाल अरविंद सावंत यांनी केला आहे. “कोणीतरी काढा दिल्यानंतर तुमचा आवाज असा विरोधात गेल्याचे दिसत आहे”, असा टोलाही अरविंद सावंत यांनी लगावला आहे.

संभाजीराजे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, “छत्रपती संभाजीराजे भाजपचे खासदार आहेत. आपण कोणाविरुद्ध आणि कशासाठी लढतोय? हे त्यांनी ठरवायला हवं. सरकार तुमच्याबरोबर आहे. न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे. मग संभाजीराजेंचे हे आंदोलन नेमके कोणाच्या विरोधात आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या का? कोणीतरी काढा दिल्यानंतर तुमचा आवाज असा विरोधात गेलेला दिसत आहे”, असा टोला देखील यावेळी अरविंद सावंत यांनी लगावला आहे.

काय म्हणाले उदयनराजे ?

उदयनराजे म्हणाले की, “मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करायची वेळ येते ही दुर्दैवाची गोष्ट आहे. राज्य सरकारने आता लवकरात लवकर मराठा आरक्षणासंदर्भातील आपली भूमिका जाहीर करावी”, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली. मराठा समाज आपल्या लोकप्रतिनिधींकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे पुढेमागे उद्रेक झाला तर त्यासाठी राज्यकर्ते जबाबदार असतील. आता आरक्षणासाठी अधिवेशन बोलवण्याची गरजच आहे. आता ‘दूध का दूध, पानी का पानी’ झालेच पाहिजे”, असे उदयनराजे यावेळी म्हणाले.

तसेच, संभाजीराजे छत्रपती हे माझे धाकटे भाऊ आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असेही यावेळी उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

संभाजीराजेंची घोषणा काय ?

संभाजीराजे यांनी आज (6 जून) मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. “छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच 16 जूनपासून आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत”, अशी घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BiharElection |…म्हणून जेडीयूने निकालांपूर्वीच मानली हार

News Desk

निवडणूक आयोग म्हणतं माध्यमांना थांबवा, सर्वोच्च न्यायालय म्हणतं जमणार नाही!

News Desk

कोरोना लसीकरणाची मोहीम संपल्यानंतर CAA लागू करणार; अमित शाहांनी केले मोठे वक्तव्य

Aprna