HW News Marathi
Covid-19

दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहिमेचा धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळीत शुभारंभ

परळी | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर एक दिवस राखीव ठेवत दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली असून, या मोहिमेचा परळीतील लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंगमंदिर येथील लसीकरण केंद्रावर धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

दिव्यांग व्यक्तींना लसीकरण केंद्रावर ये-जा करणे, यासह अन्य अडचणींचा विचार करून सामाजिक न्याय विभागाने दिव्यांग व्यक्तींचे प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केला होत्या. त्यानुसार एक दिवस फक्त दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणा साठी राखीव ठेऊन प्राधान्याने त्यांचे लसीकरण करण्याच्या या विशेष मोहिमेची बीड जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे. ही मोहीम संपूर्ण राज्यात राबविण्याचा आपला मानस आहे, असे मत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

दरम्यान आज रोजी बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय लसीकरण केंद्रांवर 45 वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली असून, या मोहिमेला जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळाला असून, सायंकाळी 4 वाजेपर्यंत 1000 पेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात निर्बंध कडक करणार की लॉकडाऊन? आज अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक

News Desk

“लॉकडाउन आवडे सरकारला”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

News Desk

केंद्राला लसीचा तुटवडा माहित असूनही लसीकरणाची घोषणा करून टाकली, सीरमचा मोठा दावा

News Desk