HW News Marathi
Covid-19

मोदींच्या थाळ्या पिटण्याच्या मोहिमेत सहभागी झालेल्या आनंद महिंद्रांचा महाराष्ट्रातल्या लॉकडाऊनला मात्र विरोध !सामनातून रोखठोक ताशेरे …

मुंबई | राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊनचे संकेत वारंवार दिले जात आहेत.या लॉकडाऊनला सरकारमधील अनेक पक्षांनी विरोध दर्शवला आहे.दुसरीकडे काही क्षेत्रांतील तज्ञांनीसुद्धा या लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.काही दिवसांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनीदेखील या लॉकडाऊनला विरोध दर्शवला होता. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोध करू नका मला ५० डॉक्टर्स द्या असा टोला लगावला होता.त्यावरूनच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना टोला लगावला. “पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रीय लॉक डाऊन मोहिमेत महिंद्रा सामील झाले होते व त्यांनी थाळ्या पिटण्याचा आनंदही साजरा केला होता,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

रोखठोकमध्ये मोदी सरकारवर काय टिका केली ?

कोरोनामुळे देशाची गती मंदावली आहे, पण राजकारणातले वारे जोरात सुरू आहेत. महाभारताचे युद्ध 18 दिवसांचे. कोरोनाचे युद्ध 21 दिवसांत जिंकू, असे वर्षभरापूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. कोरोना पराभूत झाला नाही, पण ममता बॅनर्जींना हरविण्यासाठी राजकीय युद्ध सुरूच आहे. हे तर नवेच महाभारत सुरू झाले! असा टोला शिवसेनेनं केंद्र सरकारला लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरात याबाबत टीका करण्यात आली आहे.

विरोधी पक्ष आता लॉकडाऊशिवाय कोणता पर्याय सुचवणार ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन टाळण्यासाठी विरोधकांकडे,विविध क्षेत्रातील लोकांकडे कोणते पर्याय आहेत यांची विचारणा केली आहे.त्यावरून सामनामध्ये आज रोखठोक सदरात विरोधकांवर निशाणा साधण्यात आलेला आहे. रोखठोकमध्ये संजय राऊत म्हणतात,मुंबईसारख्या शहरातले कोविड सेंटर्स आज पूर्ण भरले आहेत. नव्या रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत अशी स्थिती आहे. श्रीमंतांच्या खासगी रुग्णालयांतही जागा नाही. असे अभूतपूर्व संकट आज महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. संपूर्ण देशात कोविडचा कहर आहे, पण महाराष्ट्र त्यात एक पाऊल पुढे आहे हे दुर्दैव. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार सांगत होते, ‘हात धुवा, मास्क लावा, अंतर पाळा.’ तेव्हा त्यांच्यावर टीका करणारा विरोधी पक्ष आता यावर काय उपाययोजना देणार? असा प्रश्नही शिवसेनेनं केला आहे.

विरोधासाठी विरोध करताना आपण जनतेच्या जिवाशी आणि राज्याच्या प्रतिष्ठेशी खेळत आहोत याचे भान विरोधी पक्षाने ठेवले नाही. राज्याच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्री सांगतात ते योग्य आहे, असे विरोधी पक्षाने पुढे येऊन सांगायला हवे होते. त्यात सगळय़ांचेच हित झाले असते, असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.

कोरोनाच्या काळातही राजकारण जोरात !

महाराष्ट्रासह देशाची गती मंदावली असली तरी राजकारणाचा वेग जोरात आहे. तेथे कोरोनाचे भय अजिबात नाही. प. बंगालात विधानसभेचे तीन टप्पे पार पडले. हजारोंचे रोड शो, लाखोंच्या सभांत कोरोनाचा लवलेशही आढळला नाही. मथुरेत होळी साजरी झाली. त्यात लाखो लोकांनी भाग घेतला. ‘लॉकडाऊन’चे दरवाजे देवाचिया द्वारी तुटून पडले, पण त्यामुळे कोरोना संपूर्ण खतम झाला असे घडले नाही, असेही रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

” पहिल्या लॉक डाऊनला वर्ष झाले. २४ मार्च २०२० च्या संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांनी अचानक संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केला. त्यानंतर जे घडत गेले ते धक्कादायक आणि अमानुष होते. ‘हिंदुस्थान को बचाने के लिए, हिंदुस्थान के हर नागरिक को बचाने के लिए, आप सभी को बचाने के लिए, आपके परिवार को बचाने के लिए आज रात १२ बजे से घरों से बाहर निकलने पर पुरी तरह से पाबंदी है!’ ही घोषणा मोदींनी करताच संपूर्ण देशात हाहाकार माजला. स्वातंत्र्यानंतरचे सगळय़ात मोठे पलायन हिंदुस्थानने याच काळात पाहिले. देशभरात लोकं अडकून पडले. ऑटो, सायकल, बाईकने, पायी चालत असा प्रवास लोकांनी दोन-दोन हजार किलोमीटर केला. त्या प्रवासात अनेकांनी प्राण सोडले. पुढचे सहा-सात महिने लोकांनी घरातच कोंडून घेतले. कमाईचे साधन बुडाले.रोजगार संपला, पण भीतीने त्या सगळय़ांना घरात कोंडून ठेवले. त्या भीतीची भिंत आता फुटली आहे. ती बांधता येणे कठीण आहे. महाभारताची लढाई १८ दिवस चालली. तुम्ही मला २१ दिवस द्या. २१ दिवसांत कोरोनाला हरवू, असे पंतप्रधान म्हणाले होते. आज एक वर्षानंतरही कोरोनाची लढाई व लॉकडाऊनची भीती कायम आहे. कोरोना हरणार नाही. ममता बॅनर्जी यांना हरवण्यासाठी सरकारने शक्ती पणाला लावली,” असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवरही टीकास्त्र डागलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Corona World Update : जगभरात ३१ लाखांहून अधिकजणांना कोरोनाची लागण

News Desk

कथित ऑडिओनंतर एकनाथ शिंदे म्हणाले… पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते !

News Desk

नागपुरात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता जात असाल तर सावधान

News Desk