HW News Marathi
देश / विदेश

धक्कादायक ! निवडणूक आयोगाची गाडी खराब, EVM साठी थेट भाजप उमेदवाराच्या गाडीचा वापर ?

नवी दिल्ली । देशात सद्यस्थितीत एकूण ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकांसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. यावेळी गुरुवारी (१ एप्रिल) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. मात्र, या दरम्यान आसामच्या पाथरकंडी विधानसभा मतदारसंघातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका भाजप उमेदवाराच्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो कारमध्ये EVM मशिन आढळून आली आहे. कृष्णेंदू पॉल असे ते भाजप उमेदवाराचे नाव आहे. दरम्यान, या धक्कादायक प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही ट्विट केलंय.

पाथकरकंडीचे विद्यमान आमदार आणि सध्याच्या निवडणुकीतील भाजपा उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची ही कार असल्याचा दावा विरोधी पक्षाकडून केला जात आहे. त्या कारचा नंबर AS 10 B 0022 असून याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, या प्रकारानंतर काँग्रेससह भाजपा विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेऊन निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभा केले होते. त्यानंतर, याप्रकरणी निवडणूक आयोगाने 4 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

निवडणूक आयोगाची गाडी खराब झाल्याने EVM साठी भाजप नेत्याच्या कारमधून लिफ्ट

प्रियंका गांधी यांनी या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. यावेळी, निवडणूक आयोगाची गाडी खराब झाल्याने भाजप नेत्याच्या कारमधून लिफ्ट मागण्यात आली, अशी आश्चर्यकारक प्राथमिक माहिती देण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप आमदारांची राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला मारहाणीनंतर माफीनामा

News Desk

UP मध्ये 12 वीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळला; योगी आदित्यनाथांचा निर्णय

Aprna

रेल्वे आणि विमान वाहतूक सेवाही ३ मेनंतर सुरू होणार

News Desk