HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांनी संभाजीराजेंना उपकाराची आठवण करुन दिली – संजय राऊत

मुंंबई | मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या राज्यात तापला आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाष्य केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छत्रपतींना उपकाराची आठवण करुन दिली, ही गोष्ट लोकांना रुचलेली नाही. त्यामुळे अनेक लोक नाराज झाले आहेत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संभाजीराजे छत्रपती हे सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. छत्रपतींची ही नियुक्ती राष्ट्रपतींकडून भारतीय जनता पक्षाने करुन घेतली आहे. मात्र, आता चंद्रकांत पाटील यांनी छत्रपतींना या उपकाराची आठवण करुन दिली. त्यामुळे आता छत्रपती काय भूमिका घेतात, हे पाहावे लागले, असे राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून मराठा आरक्षणाची लढाई आता दिल्लीच लढणे कसे गरजेचे आहे, याविषयी भाष्य करण्यात आले आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा तिढा जसा दिल्लीत पडला होता तसाच मराठा आरक्षणाचा तिढा दिल्लीतच पडला पाहिजे. हा तिढा दिल्लीनेच सोडवावा. महाराष्ट्राला तो अधिकार नाही. संभाजीराजे छत्रपती यांनी आता याप्रश्नी लढाईचे मैदान दिल्लीतच ठरवले तर निकाल लागणार आहे.

राजधानी दिल्लीत 9 ऑगस्ट रोजी मराठा समाजाची गोलमेज परिषद घेण्याचे संभाजीराजे यांनी ठरवले आहे. ही परिषद राजकारणविरहीत व्हावी. बहुजन समाजाचा बुलंद आवाज म्हणून दिल्लीला त्या गोलमेज परिषदेची दखल घ्यावीच लागेल. मराठा आरक्षणप्रश्नी कोणीही दुटप्पी भूमिका घेऊ नये. महाराष्ट्राचे राजकारण अस्थिर करण्यासाठी विरोधी पक्ष मराठा आरक्षणाचा हत्याराप्रमाणे वापर करत असतील तर ते रोखले पाहिजे, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

मराठा आरक्षणाच्या हुकूमाची पाने मोदींच्याच हाती

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या हातात टोलवला आहे. मराठा आरक्षणाची हुकूमी पानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हाती आहेत. त्यांनीच ही पानं टाकावीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं होते. महाराष्ट्रातील प्रत्येक नेता संभाजी छत्रपती यांच्या मताशी सहमत आहे. त्यामुळे सर्व उठून मोदींकडे जाऊया. त्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असा विषय नाही. सर्वांनीच मोदींना भेटलं पाहिजे. कारण मोदींच्या हातीच आता हुकूमाची पानं आहेत. त्यांनीच ती टाकावी, असे राऊत यांनी सांगितले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्यात नौदलाचे लढाऊ विमान कोसळले, सुदैवाने पायलट बचावले

News Desk

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 10 एप्रिल रोजी नांदेडमध्ये 

News Desk

हाथरस प्रकरणाचा तपास दुसऱ्या राज्याकडे देण्यात यावा, यशोमती ठाकूर यांची मागणी

News Desk