HW News Marathi
महाराष्ट्र

“…नाहीतर मी राजकारणात येणारच नव्हते” पंकजा मुंडेंचा मोठा खुलासा

मुंबई | राज्याच्या राजकारणात अनेक वाद हे सर्वश्रुत आहेत. यातीलच एक वाद म्हणजे मुंडे भावा-बहिणीमधला वाद. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यातील वादविवाद सगळ्यांना माहिती आहेच. मात्र, या वादावादीत त्यांना एकमेकांची काळजी असल्याचंही अनेकदा दिसून आलं आहे.

जेव्हा पंकजा मुंडे कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं समजलं, तेव्हा धनंजय मुंडेंनी ट्वीट करून काळजी व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात काही जणांच्या भुवया उंचावल्या होत्या. अशा अनेक बाबी आहेतच. मात्र, आता पंकजा मुंडेंनी आपण मुळात राजकारणात का आलो, याचा खुलासा केला आहे. आणि त्याचं कारण चक्क त्यांनी ‘धनंजय मुंडे’ आहेत असं सांगितलं आहे. लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याविषयी आपली भूमिका मांडली आहे.

“धनंजय मुंडेंचं काम पसंत नव्हतं, म्हणून मी राजकारणात आलेे”

धनंजय मुंडे यांच्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. “धनंजय मुंडेंचं काम पसंत नव्हतं, म्हणून मी राजकारणात आले. मी राजकारणात येणार नव्हते. तेव्हाच्या परिस्थितीत इतकं बोललं जात होतं की धनंजय निवडून येणार नाही, पंकजा मुंडेंना उभं करा. नाहीतर मी राजकारणात येण्यासाठी अजिबात इच्छुक नव्हते तेव्हा. आत्ता आले. आता धनंजय मुंडे यांनी चांगलं काम करावं अशा शुभेच्छाही मी त्यांना दिल्या. पण मला नाही वाटत आता जिल्ह्यातले लोकं समाधानी आहेत”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

धनंजय मुंडे फक्त परळीपुरतेच मर्यादित आहेत

दरम्यान, यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या कार्यपद्धतीतील उणिवा सांगितल्या. “धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांचा लोकांना त्रास आहे. त्यांच्यावर ते नियंत्रण ठेवत नाहीत ही लोकांमधली चर्चा आहे. मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम केलं. पण धनंजय मुंडे परळीपुरतं मर्यादित राहिले. मी राज्याची मंत्री म्हणून काम करताना परळीच्या एखाद्या कामाकडे दुर्लक्ष झालं असावं पण धनंजय मुंडेंचं जिल्ह्यामध्ये वास्तव्य करताना इतर ठिकाणी फारसा वावर दिसत नाही. जिल्ह्याचे विषय हाताळताना ते दिसत नाहीत. वाळू माफिया, सिविल सर्जन हे विषय हाताळताना ते दिसत नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांचा सुळसुळाट आहे. त्यावर लोकांची नाराजी आहे.”, असं त्या म्हणाल्या. “ज्या गुंड प्रवृत्ती आम्ही दाबून टाकल्या होत्या त्या आता पुन्हा बाहेर आल्या आहेत”, असं देखील पंकजा मुंडे यांनी नमूद केलं.

मुंडे भगिनींसाठी धनंजय मुंडेंची भावूक पोस्ट!

एप्रिल महिन्यात पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं होतं. त्यावर धनंजय मुंडेंनी फेसबुक पोस्ट करून पंकजा मुंडे यांना धीर दिला होता. “पंकजाताई, कोरोना विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई,” अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली होती. प्रितम मुंडे यांना देखील प्रकृती अस्वास्थ्य जाणवत असताना धनंजय मुंडेंनी त्यांच्यासाठी पोस्ट केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘टीआरपी’ घोटाळ्याची चौकशी केली नसती तर या देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते  – जयंत पाटील

News Desk

भाजपला माझ्याकडे राजीनामा मागण्याचे नैतिक अधिकार नाही, यशोमती ठाकूर यांचा चंद्रकांत पाटलांना पलटवार

News Desk

राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या साखर कारखान्याची १३ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त

Aprna