सातारा | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (२८ मे) सातारा जिल्ह्याचा आढावा घेतला. कोरोना काळात तेथील लोकप्रतिनिधी काय आणि कसे काम करत आहेत हे पाहण्यासाठी अजित पवार साताऱ्यात गेले होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि पत्रकार यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.
अजित पवारांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत आमदार निलेश लंके यांच्या कामाची पद्धत चांगली आहे. तर सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधिंच्या कामाचा आढावा घ्यावा , अशी मागणी पत्रकारांनी केली आणि देसाई आणि पत्रकारांत जुंपली.
साताऱ्यात १-२ प्रतिनिधी सोडले तर कोणीही काम केलं नाही असं पत्रकार म्हणाले. यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा असतो. आम्ही काय केलं ते माझ्या मतदारसंघात जाऊन पाहा. सातारा सोडा आणि मतदारसंघात जा आणि बघा. आम्ही काम केलं आहे ते जाऊन पाहा, असं शंभूराज देसाई म्हणाले.
पत्रकार आणि शंभूराज देसाई यांच्यातील या वादाला अखेर वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांनी पडदा टाकला. यावेळी पत्रकारांनी म्हटलं की आम्ही लोकांसाठी बोलत आहोत वैयक्तिक इथे काही नाही आहे. आम्ही कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतलं नाही. केवळ जिल्ह्याची अवस्था सुधारली पाहिजे इतकं वाटतं म्हणून बोललो, असं पत्रकार म्हणाले.
आमदार निलेश लंके यांच्याबाबत पत्रकार काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार काल साताऱ्यात गेले असता तिथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी अजित पवारांना साताऱ्यात एक तरी निलेश लंके होईल का? असा प्रश्न विचारला. यावर अजित पवार म्हणाले की, प्रत्येक जागी निलेश लंके निर्माण होतात अशातला भाग नाही. वेगळ्या पद्धतीने काम करण्याची सगळ्यांची पद्धत आहे. प्रत्येकजण आपल्या परीने कामत करत असतात. निलेश लंके यांना मी, शरद पवार आम्ही सगळेच सांगतो की कोरोना पेशंटच्या सोबत तुम्ही राहून काळजी घ्या. त्यांच्यासोबत तुम्ही मास्क न लावता राहता, जेवता हे सगळं करताना काळजी घेतली पाहिजे. निलेश लंके हे इतरांची काळजी घेण्यासाठी आपल्याला हवे आहेत पण त्यांनी स्वतःची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. निलेश लंके यांनी केलेलं काम कौतुकासपद आहे. भारताबाहेर त्याचं नाव झालं आहे. सगळेच निलेश लंके झाले असते तर त्यांच्या कामाची तुलना म्हणून तुम्ही घेतलं नसतं, असं अजित पवार म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.