HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेडमधील होल्ला मोहल्ला कार्यक्रमात तुफान राडा, पोलिसांच्या गाड्या फोडल्या!

नांदेड | यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने होळी खेळण्यासाठी काही निर्बंध लावले होते. मात्र, सणासुदीला गालबोट लावणारी एक घटना घडली आहे.नांदेड येथे होळीच्या दिवशी शिख समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दरवर्षी होल्ला मोहल्ला मिरवणूक काढण्यात येते. परंतु जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाकडून लॉकडाऊन लावण्यात आला असल्याने, या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती.

मात्र प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली करत हल्लाबोल मिरवणुकीतील काही तरुणांनी परवानगी का नाकारली म्हणून चक्क पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक केली. यात चार पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून पोलिस अधीक्षक यांच्या वाहनांसह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या गाड्यांचे प्रचंड नुकसान करण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए |

News Desk

एखाद्या व्हायरसप्रमाणे आपला राजकीय रंग बदलणे पडळकरांचा गुणधर्म | प्राजक्त तनपुरे

News Desk

दुध आंदोलनाचा भडका झाला अधिक तीव्र !

swarit