उत्तराखंड | संपूर्ण देशात आणि राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. अशा परिस्थितीत होळी,धुळवड या सणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून सण साजरे करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीसुद्धा उत्तराखंडमध्ये आपल्या घरी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली. त्यांना यावेळी नृत्याचा आनंददेखील घेतला.राज्यपालांच्या घरी पारंपरिक वाद्य आणि नृत्य पार पडलं. तसंच फुलांची उधळणही करण्यात आली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ट्विट केले आहे की , उत्तराखंडमध्ये होल्यारो यांचं निवासस्थानी स्वागत केलं आणि कुमाऊँनी खडी होलीमध्ये सहभाग घेतला’. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य करताना आणि टाळी वाजवून वाद्यांना साथ देताना कोश्यारी दिसून आले. यावेळी फुलांची उधळण करण्यात आली.
अपने गृह प्रदेश उत्तराखण्ड में होल्यारों का अपने आवास में स्वागत किया व कुमाऊँनी खड़ी होली में सहभागिता की । pic.twitter.com/zRtnQAvAre
— Bhagat Singh Koshyari (@BSKoshyari) March 28, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.